नांदेड| 5 जानेवारी भारत स्वाभिमान वर्धापन दिनानिमित्त नांदेड शहरातील वंचितांना गरम चादरीचे वाटप करण्यात आले. दत्तात्रय काळे, अनिल अमृतवार, शिवाजीराव शिंदे हळदेकर, प्रदीप तेललवार, राजू सातोनकर आदींनी पाच तारखेला सकाळी चार वाजता फिरून झोपल्या ठिकाणी जे रस्त्यावर उदरनिर्वाह करतात अशांना चादरीचे वाटप केले तसेच कचरा गोळा करणाऱ्यांना चादर वाटप करण्यात आले.
समाजला आपलं देणं लागतं आणि कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आपण ते दिले पाहिजे. दानाने धनाची शुद्धी होते. असे विचार अनिल अमृतवार यांनी व्यक्त केले. चादरी साठी आर्थिक मदत पंढरीनाथ कंठेवाड राज्य कार्यकारणी सदस्य महाराष्ट्र पूर्व, शोभा भागिया राज्य प्रभारी पतंजली महिला योग समिती महाराष्ट्र पूर्व, दत्तात्रय काळे राज्य प्रभारी पतंजली किसान सेवा समिती महाराष्ट्र पूर्व, वसंतराव कल्याणकर, प्रदीप तेललवार, अशोक कुरडे, सुरेखाताई घोगरे, अनिल कामिनवार, व्यंकटेश कवटेकर, भक्ती लॉन चे साधक, पंचाभाई पतंजली प्रभारी नागपूर, उमेश सातोणकर, राजेंद्र शंकरपुरे, जयचंद तत्तापुरे, श्रीकांत अकोलकर आदिनी मदत केली.