नवीन नांदेड। धनेगाव परिसरा लगत नव्याने होत असलेल्या 361 महामार्ग मुळे जवळपास रस्ता लगत करण्यात येणाऱ्या नाली बांधकाम मुळे तिनशे दुकान व्यावसायिक यांच्या व्यवसायावर परिणाम होणार असल्याने रस्ता व नाली बांधकाम एक सारखे करावे, व नियोजित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण यासह धनेगाव व मुजामपेठ गावासह अंतर्गत जाण्यासाठी मुख्य मार्गावर बोगधे करावे अन्यथा तिव्र आंदोलन करण्याचा ईशारा माजी जिल्हा परिषद सदस्य तथा नांदेड दक्षिण तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष मनोहर पाटील शिंदे,धनेगाव ग्रामपंचायत संरपच गंगाधर ऊर्फ पिंटू पाटील शिंदे यांनी निवेदनाद्वारे प्रकल्प व्यवस्थापक यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
धनेगाव/मुजामपेठ हि एक ग्रामपंचायत आहे दोन्ही गाव वेगवेगळ्या जागी वसलेली आहेत दक्षिण व उत्तर बाजूस वसलेले आहे या दोन्ही गावाच्या नागरिकांचे दोन्ही गावात शेती आहे, ग्रामस्थांना ये जा करण्यासाठी हा रस्ता जवळचा होता पण राष्ट्रीय महामार्ग झाल्यामुळे गावकऱ्यांना गावाला वळसा घालून जावावे लागत आहे त्यामध्ये अंत्यविधी, दवाखाना साठी, उपजीविकेसाठी नांदेड शहरात जावे लागत आहे , गावातील मुख्य रस्त्यावर शेतकरी व गावकरी यांनी मिळून गावासाठी चार ब्रिज बोगद्याची मागणी ग्रामपंचायत व धनेगाव येथील सर्व ग्रामस्थ यांच्यी मागणी होती व ती सुद्धा अध्याप पर्यंत पूर्ण झाली नाही.
धनेगाव चौकात असलेला छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याची नियोजित जागेवरून स्थालंतरीत करून नवीन जागा नियोजित करून देऊन सुद्धा सुशोभिकरानाचे कामाचे आश्वासन मागील तीन वर्षापासून देत आहेत ते अध्याप पर्यंत पूर्ण झाले नाही, यासाठी सर्व अधिकाऱ्यांना कळवले होते. धनेगाव हे गाव अर्धे टेकडी वर व अर्धे टेकडीच्या खालील बाजूस वसलेले आहे त्यामुळे टेकडीवरील पाउसाचे व नाल्याचे पाणी हे टेकडीच्या खालील वसलेल्या लोकांच्या घरात जात आहे, जेंव्हा पासून राष्ट्रीय महामार्गाची नाली झाली आहे तेंव्हापासून या पाण्याची विल्हेवाट व याचे नियोजन न करता या नालीचे काम केले अशी बाब के. टी. आय.एल. कंपनीच्या व सर्व अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली होती .
त्यानंतर कंपनीच्या व राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी नालीच्या रुंदीकरण व खोलीकरण करण्याची तोंडी आश्वासन दिले होते. पण अध्याप पर्यंत त्यांनी या नालीचे व साचणाऱ्या पाण्याचे निचरा होत नसून पाण्याचा निपटारा होत नसून यावर कुठलीही कार्यवाही केली नाही ,धनेगाव येथील लातूर रोडवर दोन्ही बाजूस ट्रान्सपोर्ट चा व्यवसाय, ऑटोमोबाईल, हार्डवेअर, मेकॅनिक,बोडी बिल्डर,टायर ची दुकाने व सर्व ट्रक टेम्पो कंटेनर हेवी व्हेईकल्स ला लागणारे सर्व प्रकारचे महत्वाचे नांदेड जिल्ह्याचे मार्केट खूप दिवसापासून इथेच आहे. लातूर रोडवर नाली आणि सर्विस रोड मध्ये जवळपास 0.5 फुट 1 फुट अंदाजे अंतर असल्यामुळे ते वाहने नालीवरून समोरील दुकानवर गाडीच्या कामासाठी जात असतात त्यासाठी नालीवरून दुकानासमोर जाऊ शकत नाहीत नाली वरील स्लॅब उंच झाल्यामुळे नालीचे पण नुकसान होत आहे व गाड्या पण सर्विसेस साठी जाऊ शकत नाही.
यामुळे जवळपास दोन हजार दुकानदार बेरोजगार होतील त्यामुळे नालीचे व सर्विस रोडची उंची सारखीच ठेवावी ठेवली तर नालीचे नुकसान पण होणार नाहीत व दुकानदार पण बेरोजगार होणार नाहीत, राष्ट्रीय महामार्ग 361 यांनी नेहमी ग्राम पंचायत धनेगाव व गावकल्यांनी वेळोवेळी जिल्हाधिकारी कार्यलय व राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांना कळवून सुद्धा आश्वासन पूर्तता झाली नाही वरील कामांचे विचारपूस केली असता खोटे आश्वासने देऊन ग्रामपंचायत व जनतेची दिशाभूल करत आहेत. के. टी. आय.एल. कंपनीचे अधिकारी लोकप्रतिनिधीचे व गावकऱ्यांचे म्हणणे न विचारात घेता मनमानी प्रमाणे काम करत आहेत.
वरील कामाची व आश्वासनांची पूर्तता न झाल्यास सर्व गावकरी व ग्रामपंचायत धनेगाव रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे जी प सदस्य तथा काँग्रेस तालुका अध्यक्ष मनोहर पाटील शिंदे ,संरपच गंगाधर शिंदे यांनी निवेदनाद्वारे ईशारा दिला असुन या निवेदनाचा प्रति नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोहनराव हंबर्डे, यांच्या जिल्हाधिकारी , नांदेड,पोलीस अधीक्षक नांदेड यांना दिल्या आहेत.