नांदेडराजकिय

भारतीय जनता पार्टीच्या अर्थसंकल्प मार्गदर्शक बैठकीत धनाजी जोशी यांचा सत्कार

देगलूर। भारतीय जनता पार्टी देगलूर तालुका व शहर आयोजित दिनांक आठ जुलै रोजी अशोका पॅलेस येथे भाजपच्या विशेष अर्थसंकल्प मार्गदर्शन बैठकीत राष्ट्रीय ओबीसी फाउंडेशनच्या मराठवाडा अध्यक्षपदी धनाजी जोशी यांच्या निवड झाल्याबद्दल त्यांचा देगलूर बिलोली मतदारसंघाचे माजी आमदार तथा उत्कृष्ट सांसद पटू सुभाषजी साबणे साहेब यांच्या हस्ते व भारतीय जनता पार्टीच्या तालुका व शहर च्या वतीने सत्कार करण्यात आला.

अर्थसंकल्प मार्गदर्शन बैठक देगलूर-बिलोली विधानसभेचे मा. आमदार सुभाषराव साबणे यांच्या अध्यक्षतेखाली देगलुर येथे संपन्न झाली. यावेळी नांदेड जिल्हा सरचिटणीस डॉ. माधव पाटील उच्चेकर यांनी अर्थसंकल्पातील महत्त्वपूर्ण विषय पदाधिकाऱ्यांना समजावून सांगितले.जनहिताच्या लोककल्याणकारी योजना विषयक माहिती दिली व जनतेपर्यंत या योजनेचा लाभ लाभार्थ्याला मिळवून देण्याबाबत पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. माधव पाटील उच्चेकर जिल्हा सरचिटणीस भाजपा नांदेड जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य सभापती मिसाळे गुरुजी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष संतोष पाटील जिल्हा उपाध्यक्ष अशोकजी साखरे, भाजपाचे ज्येष्ठ नेते उत्तम कुमार कांबळे साहेब ,भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष अनिल पाटील खानापूरकर, शहराध्यक्ष प्रशांतजी दासरवार, भाजपाचे जेष्ठ नेते अवधूत मामा भारती, बालाजी पाटील गंवडगावकर ,मन की बात जिल्हा प्रमुख शिवकुमारजी देवाडे ,माझी शहराध्यक्ष गंगाधरजी दाऊलवार ,शहर चिटणीस मुकुंद भुताळे,

शहर चिटणीस दीपकजी संगमकर, विधी सेलचे धोंडीबा देवकते, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सचिन पाटील किनीकर साहेब ,तालुका चिटणीस संजयजी पांचाळ साहेब, युवा मोर्चा शहराध्यक्ष सौरभ मधुरवार, विधी सेलचे एडवोकेट अवधूत राजकुंटवार, लक्ष्मीकांत चिद्रावार ,उमाकांतजी मुंडकर, मुखेड भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष मुजाहिद चोंडीकर, शेळगावकर पाटील यांच्या समवेत अनेक भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व ग्रामीण & शहरातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!