हिमायतनगर शहरासह तालुक्यात धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा
हिमायतनगर| शहरात धम्मचक्र प्रर्वतनदिनाच्या निमित्ताने येथील बौद्ध अनुयायांनी शहरातील मुख्य रस्त्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसह पंचरंगी ध्वज असलेल्या वाहनांची डीजेच्या तालावर भव्य शोभा यात्रा काढली होती.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त समाजबांधवानी येथील नालंदा बौद्ध विहारांमध्ये अनेक उपासक-उपासिकांनी त्रिशरन पंचशिल गृहन करुन ध्वाजारोहन केले. आणि एक दुसऱ्याला धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभकामना दिल्या. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शहरातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा काढली. दुपारी १२ वाजता निघालेली शोभा यात्रा शहरातील ठिकठिकाणच्या चौकात येताच अनेक राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.
यात मोठ्या प्रमाणात बालक, युवक, युवतींनी मिरवणुकीत सामील होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. शहरातील परमेश्वर मंदिर मैदानात येताच फुलांची उधळण करत मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. यावेळी युवकांनी डीजेच्या तालावर ठेका धरला होता. या मिरवणुकीत शेकडो महिलां – पुसरुषांसह युवकांनी सहभाग घेतला. मिरवणूक शांततेत पार पडावी म्हणून पोलीस निरीक्षक अमोल भगत यांनी चोख पोलीस बंदोबस्त लावला होता.