आळणी बुवा मठ संस्थान येथे संतसंगमेश्वर यात्रेला भाविक भक्तांची गर्दी
नवीन नांदेड। नांदेड तालुक्यातील धनेगाव परिसरातील गोदावरी नदी जुना पुलाजवळ असलेल्या संत संगमेश्वर तारातीर्थ आळणीबुवा मठ संस्थान येथील यात्रेस १० फेब्रुवारी रोजी सुरूवात झाली असून येळेगाव व सुकळी येथुन आलेल्या पायी दिंडी पालखिचे स्वागत व विधीवत पुजन मुख्यपुजारी तथा माजी जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब महाराज यांनी केले, यावेळी पंचक्रोशीतील अनेक भाविक भक्तांनी मोठया संख्येने उपस्थित राहून दर्शन घेतले यावेळी भक्तासाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
धनेगाव परिसरातील गोतमेश्वर संत संगम आळणीबुवा मठ संस्थान अर्ध कुंभ असून गेल्या १२५ वर्षापासून १० फेब्रुवारी रोजी ही यात्रा भरत असते या यात्रेत विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील सुकळी या गावातून व येळेगाव हिंगोली येथुन पायी दिंडी पदयात्रा येत असते , सकाळी यदुबन महाराज कौलंबीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रावसाहेब महाराज,गणेश गिरी महाराज यांच्या हस्ते विधीवत महापूजा करण्यात आली, यात्रेनिमित्त मंदीरात फुलाची सजावट करण्यात आली, सकाळपासून मोठया प्रमाणात पंचक्रोशीतील अनेक गावातील भाविक भक्तांनी मोठया प्रमाणात दर्शनासाठी गर्दी केली.
यावेळी नांदेड जिल्हा परिषद माजी सदस्य तथा नांदेड तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष मनोहर पाटील शिंदे, विजयाताई देवराव शिंदे, संचालक नाजिमसह बॅक, धनेगाव ग्रामपंचायत सरपंच गंगाधर ऊर्फ पिंटू पाटील शिंदे, शिंदे शिवसेना गटाचे उध्दव पाटील शिंदे,अनिल पाटील कवाळे, डॉ. प्रकाश शिंदे,राम पाटील शिंदे, दिगंबर शिंदे,नितिन पाटिल शिंदे, शिवराज पाटील दुरपडे, यांच्या सह धनेगाव गावातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित भाविक भक्तांसाठी महाप्रसाद आयोजन करण्यात आले, ग्रामीण पोलीस निरीक्षक आयलाने,यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मटवाड, महिला पोलीस कर्मचारी, पोलीस अमलदांर यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला.
यात्रे निमित्ताने अनेक व्यावसायिक यांनी खेळणारी साहित्य, देव देवता, महाप्रसाद यांच्या अनेक दुकाने मोठया प्रमाणात लागली होती, दुपारी १२ वाजता हभप सखाराम महाराज सुकळीकर,राम महाराज,सुकळीकर हारी महाराज येळगाव हिंगोली यांच्ये कीर्तन झाले तर सु. ग.चव्हाण यांचे प्रवचन झाले, कौलंबी येथील बसवन महाराज, दामोदर महाराज गोपाळचावडी,हारीहर महाराज मरळक,यांच्यी उपस्थिती होती.