धर्म-अध्यात्मनांदेड
हिमायतनगरच्या लकडोबा चौक स्मशानभूमीत विराजमान झाले देवधीदेव महादेव
हिमायतनगर। लकडोबा चौकात असलेल्या हिंदू स्मशानभूमीचा हळू हळू कायापालट होत लागला असून, आज दि.20 में परिसरातील नागरिक, भजनी मंडळाच्या सानिध्यात भव्यदिव्य अशी भगवान शिवशंकर अर्थात देवधीदेव महादेवाची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. यावेळी श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टकडून स्मशानभूमीत भव्य स्वागत कमान उभारून देणार असल्याचे महाविरचंद श्रीश्रीमाळ यांनी सांगितले. तर उपस्थित अनेकांनी सहयोग म्हणून बसण्यासाठी खुर्ची व सुशोभीकरण करण्यासाठी देणगी दिली आहे. याप्रसंगी मोठया प्रमाणावर महिला पुरुष नागरिक व गावकरी उपस्थित होते.
हिमायतनगर शहरातील स्मशानभूमीची दयनीय अवस्था झाल्याने मृत्यूनंतर प्रेताची अवहेलना होऊ लागली, ही बाब लक्षात घेऊन शहरातील युवकांनी पुढाकार घेऊन लकडोबा चौकातील हिंदू स्मशानभूमीचा कायापालट करण्याचा संकल्प केला. सहा महिण्यापासून स्मशान भूमी परिसराची श्रमदानातून स्वच्छता करण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. त्यासाठी समिती देखील नेमण्यात आली असून, युवकांनी हाथी घेतलेल्या सामाजिक कार्याला लक्षात घेऊन अनेक दानशूर दात्याने स्मशानभूमीसाठी देणगी, बांधकाम साहित्य आणि घडेल त्या पद्धतीने श्रमदान करून हातभार लावला आहे. त्यामुळे स्मशानभूमीचा कायापालट पाहून परमेश्वर मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ यांनी येथे महादेवाची मूर्ती भेट दिली. आज महादेवाची मूर्तीची गावकऱ्यांनी उपस्थित होऊन स्थापना केली, त्या निमित्ताने भजनाचा जंगी सामना व महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. आता अंत्यविधीसाठी आलेल्या भाविकांना महादेवाचे दर्शन होणार आहे.
यावेळी श्री परमेश्वर मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ, सेक्रेटरी अनंतराव देवकते, संचालक वामनराव बनसोडे, अनिल मादसवार, संजय माने, विलास वानखेडे, लकडोबा हनुमान मंदिराचे अध्यक्ष तुकाराम मेरगेवाड, विहिपचे गोरक्षा नांदेड जिल्हा प्रमुख किरण बिचेवार, स्मशानभूमीत विकास समितीचे अध्यक्ष श्याम ढगे, ज्ञानेश्वर शिंदे, रामभाऊ सूर्यवंशी, गोविंद शिंदे, परमेश्वर तीप्पनवार, मुन्ना शिंदे, डॉ राजेंद्र वानखेडे, डॉ विकास वानखेडे, डॉ वाकोडे, डॉ वाळके, राम जाधव, वामनराव पाटील मिराशे वडगावकर, विनोद आरेपल्लू, मारोती हेंद्रे, ज्योतीताई बेदरकर, जोतिताई हरडपकर, बालाजी ढोणे, विलास वानखेडे, श्याम ढगे, लक्ष्मण डांगे, गजानन पाळजकर, राम नरवाडे, नागनाथ अक्कलवाड सर, रामराव सूर्यवंशी, बाबुराव होनमणे, बाबुराव मेरगेवाड, विठ्ठल फुलके, भाऊराव माने, सुधाकर चिट्टेवार, सुभाष शिंदे, मायंबा होळकर, साहेबराव अष्टकर, राजदत्त सूर्यवंशी, संतोष वानखेडे, अनिल भोरे, बाळूअण्णा चवरे, बाबुराव सकवान, दिनेश राठोड, बालाजी तोटेवाड, महेश अंबिलगे, पापा शिंदे, श्रीकांत घुंगरे, अंडगे सर, कागणे सर, अनिल माने, बालाजी बक्केवाड, बाबुराव माने, अजय बेदरकर, माधव ढोणे, राजू पांढरे, प्रकाश सुकलवाड, शाहीर वानखेडे, परमेश्वर उटलवाड, श्याम तोटेवाड, गंगाधर मिरजगावे, वऱ्हाडे सर, व्यंकटराव चवरे, संतोष पुठेवाड, आदिंसह मोठया प्रमाणावर महिला पुरुष नागरिक उपस्थित होते.
हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी येथे दहा लाख रुपयांचा सिमेंट कोंक्रेट रस्ता व पथदिव्यासाठी फोकस उपलब्ध करून दिले आहेत. तसेच लोकप्रिय नेते बाबुराव कदम कोहळीकर यांच्या पाठपुराव्याने हिंगोलीचे खासदार हेमंत भाऊ पाटील यांनी स्मशानभूमीच्या विकासासाठी पन्नास लाखाचा निधी मंजूर करून दिला असून, या कामाला देखील लवकरच सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.