नांदेड/लोहा। शहर व परिसरात रविवार दुपारी तीन -साडे तीन वाजण्याच्या सुमारास जोरदार वादळी वाच्यामुळे हाहाकार उडाला आहे अर्धा तास पाऊस आणि झालेली वाऱ्यामुळे झाडे, मुळासगट उन्मलून पडली.विद्युत पोल, डिपी मोडून पडल्या, तारा तुटल्या. शेवंडी बाजीराव येथे ट्रॅक्टरची ट्रॉली पडून एक जण ठार झाले तर आंबेसांगवी येथे शेड पडल्याने एक वासरू दगावले. शहरातील लिंबोनी गल्लीत साठ वर्षा पूर्वीचे जुने झाड पडल्याने तीन घरे उध्वस्त झाली. लाईटचा मोठे नुकसान झाले असून शहरात सोमवारी दुपार पर्यत वीज पुरवठासुरळीत होईल असे सांगण्यात आले.
लोहा शहर व तालुक्यात रविवारी दुपारी तीन ते चार वाजण्याच्या सुमारास जोरदार वादळी पाऊस झाला.या चक्री वादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेवंडी (बा) येथील शिवाजी विठ्ठल मुडेवाड हे वादळात ट्रॅक्टर जवळ थांबले असता त्याची ट्रॉली अंगावर पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला यावरून वाऱ्याचा वेग कसा जीवघेणा होता हे स्पष्ट झाले. शहरातील लिंबोनी गल्ली येथे पन्नास साठ वर्षापूर्वीचे लिंबाचे झाड कोळसले यात १) दीपक चिंतेवार 2) ज्ञानेश्वर चितेवार 3) योगेश चिंतेवार यांच्या घरावर हे झाड पडल्याने तिन्ही कुटुंब उघडयावर पडले आहे त्याचे मोठे नुकसान झाले.गव्हाळीत केशवराव मुकदम यांचे शेड, सागवान, आंब्याची झाले तुटून पडले हळद व अन्य पिकांकबे मोठे नुकसान झाले आहे.
आंबेसांगवी येथे शेड कोसळून एक वासरू मृत्युमुखी पडले.तर कारेगाव येथे केटीआयएल चे शेड उडून केले तसेच विद्युत सबस्टेशन चे मोठे नुकसान झाले आहे.कारेगाव, खडकमांजरी, पिंपळगाव, पारडी सोनखेड, शेवंडी, असाभागात विद्युत पोल ,तारा तुटून पडल्या. मौजे रायवाडी येथे नंदिकेश्वर मंदिर स्मशानभूमी पाणी फिल्टर व रस्त्याच्या कडेची झाडे व घरावरील पञे ऊडाली तर डोंगरगाव येथे पत्रे उडून एक व्यक्ती जखमी दवाखान्यात दाखल करण्यात आले.
विद्युत मंडळाचे भारी नुकसान ;पुरवठा बंद
रविवारी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे विद्युत मंडळाचे प्रचंड नुकसान झाले आहे शहर व परिसरात अनेक गावात विद्युत पोल तुटून पडले तारा तुटल्या त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. अनेक गावात वीज पुरवठा खंडित झाला आहे उपअभियंता श्री स्वामी व त्याचे लाईनमन , हेल्पर हे रविवारी दुपारी पासून वीज पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी परिश्रम घेत होते कंधार येथून होणार लाईट पुरवठा रात्री सात पर्यँग सुरळीत झाला त्यानंतर रात्रभर शहरातील विद्युत जोडणीचे काम सुरू होते.सोमवारी दुपार पर्यंत शहरात लाईट सुरळीत होईल असे सांगण्यात आले.
पंचनामे करून मदत द्या
झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत व भरपाई द्यावी अशी मागणी भाजपा तालुकाध्यक्ष आनंदराव पाटील केशवराव मुकदम , भास्कर पवार, माजी शिक्षण सभापती संजय पाटील कऱ्हाळे यांनी केले आहे.
पंचनामे करण्याचे आदेश–तहसीलदार
लोहा व परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार यांनी माहिती घेतली तर तहसीलदार विठ्ठल परळीकर यांनी झालेल्या नुकसानभरपाई साठी पंचनामे करण्याचे आदेश तलाठ्यांना दिले आहेत. नायब तहसीलदार अशोक मोकले, तलाठी मारुती कदम यांनी वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली.