क्राईमनांदेड

इज्जतगांव येथील गावालगदच्या अनधिकृत विटभट्या हटवण्याची मागणी

नायगाव, रामप्रसाद चन्नावार| नायगाव तालुक्याला लाभलेले वैभव म्हणजे गोदावरी नदी. गोदाकाठी असलेली गावे सध्या प्रदूषनाच्या विळख्यात सापडली आहेत. नदीकिनारी असलेल्या मोठं मोठ्या विट भट्या परिसरातील वातावरण दूषित करीत असल्याचे इथल्या नागरिकांने जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे.

नायगाव तालुक्यातील मौजे इज्जतगांव येथे गावालगतच मोठया विट भट्या आहेत त्याचा त्रास येथील लहान मुलांच्या आरोग्याला, वयोवृद्ध असणाऱ्या लोकांना होत आहे.तसेच येथील वीट भट्यातून सतत येणाऱ्या धुरामुळे श्वसनाचे आजार वाढत आहेत. यावर आळा बसावा म्हणून गावालगत असलेल्या पांगरीकर आणि मियाॅं शेठ यांच्या विटभट्या हटवा अशी मागणी महाराष्ट्र ऊस उत्पादक संघाचे जिल्हाध्यक्ष परमेश्वर पाटिल डोईफोडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

सदरील विटभट्या गावालगत असल्यामुळे त्यांच्या प्रदुषणाचा त्रास गावकऱ्यांना होत आहे, श्वसनाचे आजार वाढत आहेत, विटभट्यांच्या प्रदुषनयुक्त धुवामुळे पिकाचे नुकसान होत आहे, विटभट्यासाठी कामगार वेगवेगळ्या भागातून येऊन तिथे राहतात त्यांच्यामूळे कारखानाच्या बाजूच्या शेतीमध्ये प्लाॅस्टिक कचरा, वातावरण दुषित होत आहे. सदरील विटभट्यानी गावात येणाऱ्या मुख्यः डांबर रस्त्यावर अतिक्रम केले असल्यामूळे अपघात होऊ शकतो याला जिम्मेदार कारखानदार असतिल, असे निवेदनात म्हंटले आहे.

ग्रामपंचायतीने गावातील अवैध धंद्यांना पाठबळ देऊ नये तसेच येथील कारखानादार विजेची चोरी करतात तरी महावितरण याकडे दुर्लक्ष करते ही गंभीर बाब असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन सदरील विटभट्या गावापासून किमान १ कि.मी अंतरावर हलविण्यात यावे अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालय समोर अमरण उपोषणास करण्याचा इशारा महाराष्ट्र ऊस उत्पादक संघाचे नांदेड जिल्हाध्यक्ष परमेश्वर व्यंकटराव डोईफोडे यांनी दिला. या निवेदनावर गावातिल मा.सरपंच संजिव दिंगबरराव पाटिल, ग्रा.पं.सदस्य डोईफोडे, गोविंदराव डोईफोडे, बालाजी टोकलवाड, तंटामुक्ती अध्यक्ष बाबुराव डोईफोडे , दत्तराम माधवराव पोलीस पाटिल, शिवाजी डोईफोडे चेअरमन, नुकसानग्रस्त शेतकरी व्यंकटराव डोईफोडे, संभाजी डोईफोडे, बालाजी डोईफोडे, दिंगाबर डोईफोडे, चंपत डोईफोडे आदी लोकांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!