बालयोगी व्यंकट स्वामी महाराजांनी श्री वरद विनायक व कनकेश्वराचे दर्शन
हिमायतनगर। नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पांडवकालीन श्री कनकेश्वर तलावाच्या काठावर इच्छापूर्ती श्री वरद विनायक व श्री कनकेश्वर महादेव मंदिर आहे. आज चतुर्थीच्या निमित्ताने आयोजित महाप्रसाद कार्यक्रमाच्या मुहूर्तावर बालयोगी व्यंकट स्वामी महाराज याच आगमन वरद विनायक मंदिरात झाले. यावेळी पिंपळगाव येथील बालयोगी व्यंकट स्वामी महाराजांनी श्री वरद विनायक व कनकेश्वराचे दर्शन घेऊन पूजा आरती केली. तसेच मंदिर परिसराची पाहणी करून उपस्थित भाविक भक्तांना आशीर्वाद देत भगवंताचे नामस्मरण करा असे आवाहन केले.
वाढोणा शहरात असलेल्या वरद विनायक मंदिरात गणपतीची अष्टभुजधारी मूर्ती असून, प्रतयेक भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारी असल्याची आख्यायिका सानिग्ताली जाते. वर्षभरात येणाऱ्या संकष्ट चतुर्थी, अंगारिका चतुर्थी या दिवशी भाविक भक्त मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. तसेच गणेश भक्त दररोज दर्शनासाठी येऊन मनोकामना व्यक्त करून पुण्य पदरी पाडून घेतात. ज्यांच्या मनोकामना पूर्ण होतात अशा भाविकांकडून चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी येथे महाप्रसादाच्या पंगती केल्या जातात. चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी गणेशभक्त भास्कर चिंतावार व डॉ.राजेंद्र वानखेडे यांनी भव्य पंगतीचे आयोजन केले होते.
याप्रसंगी पिंपळगाव येथील बालयोगी व्यंकट स्वामी महाराजांनी श्री वरद विनायक व श्री कनकेश्वराचे दर्शन घेऊन पूजा आरती केली. महाराजांचे आगमन झाल्यानंतर डॉ.राजेंद्र वानखेडे दाम्पत्याकडून बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांचं शॉल पुष्पहाराने स्वागत करून आरती करण्यात आली. त्यानंतर उपस्थित भाविकांनी आशीर्वाद घेतल्यानंतर महाप्रसाद वितरणाला सुरुवात झाली, यावेळी हजारो भाविकांनी बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांचं दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला.