हदगाव, शेख चांदपाशा। हदगाव पंचायत समिती अंतर्गत येणारे दुर्गम भागातील गावात काही महिन्या पासून खळखळून वाहणारे नदी नाले अचानकपणे ओसाड झाल्याने पाण्याची पातळी खालवली आहे. त्यामुळे काही दुर्गम गावात पिण्याचा पाण्याची चिंता लागली असून विद्यमान आ. माधवराव पाटील जवळगावकर हदगाव विधान सभा क्षेत्रात हिमायतनगर तालुक्यातील पाणीटंचाई बैठक घेतात पण हदगाव तालुक्याची बैठक का…? घेत नाही असा सवाल येथील ग्रामस्थ करित आहेत.
याबाबत पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांना बैठकी संदर्भात विचारले असता त्यांनी सांगितले की, आम्ही आमदार साहेबांशी संपर्कात आहोत. हदगाव तालुक्यात १२५ ग्रामपंचायत असून वाडी तांड्यासह गावाची संख्या 178 आहे तालुक्यात किती दुर्गम भागात पाण्याची टंचाई आहे. किती हात पंप आहेत किती बंद आहेत दुरुस्ती साठी कोणते पथक आहेत. हातपांची संख्या करिता कर्मचारी वर्ग पुरेसा आहे की नाही. याबाबत काही ही माहिती मिळत नाही तालुक्यात सहा जिल्हा परिषद गट आहेत तालुक्यातील काही भागात महिला वर्गासह ग्रामस्थांन पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागत आहेत अशी माहिती आहे.
त्यामुळे ग्रामस्याथांना या वर्षी पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण होण्याची दाट भीती वाटत आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाऊस कमी झाल्याने गावाला पाणी पुरवण्याचे एकमेव सध्या तरी स्रोत असलेले नदी नाले हे असल्याने पिण्याचे पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. याबाबत पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडून खाजगी विहिरी नवीन विंधन विहीर घेणे इंधन विहीर विशेष दुरुस्ती नवीन योजना पूरक नळ योजना घेणे यासंदर्भात कोणतीही माहिती मिळत नाहीये हे आवर्जून उल्लेख करावा लागतो हे विशेष आहे.
हदगाव तालुक्याकडे विद्यमान आमदाराचे इतके दुर्लक्ष का..?
हदगाव तालुक्यात गेल्या वर्षी पण पाणी टंचाई निवारणार्थ आराखडा बैठक घेण्यात आली नव्हती. अशी माहिती मिळत असून याबाबत गट विकास अधिकारी यांनी सांगितले की गतवर्षी पाणीटंचाई आराखडा बैठक झाली की नाही मला माहिती नाही. विशेष म्हणजे दि 12 जानेवारी 2024 ला आमदारांच्य उपस्थितीत उपस्थितीत हदगाव विधान सभा क्षेत्रातील हिमायतनगर तालुक्यात पाणीटंचाई संदर्भात अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली होती. पण हदगाव तालुक्यात या संदर्भात बैठक विद्यमान आमदार साहेब का..? घेत नाही. याबाबत प्रशासनाकडून काहीही माहिती मिळत नाही. आणखीन विशेष म्हणजे विद्यमान आमदार हदगाव तालुक्याकडे इतके दुर्लक्ष का…?करतात अशी ग्रामस्थात चर्चा ऐकाच मिळत आहे.