लोहा| जिल्ह्याचे राजकारण नेहमीच लोहा कंधार तालुक्याच्या भोवती फिरले आहे आणि राज्यात घडलेल्या राजकीय भूकंपात याच दोन तालुक्याची जोरदार चर्चा सुरू आहे. श्रद्धेय शंकरराव चव्हाण यांच्या सोबत निष्ठेने काँग्रेस पक्षाचे काम करणारे पक्षाचे जेष्ठ नेते कल्याणराव सूर्यवंशी यांनी बदलत्या राजकीय परिस्थितीत आम्ही अशोकराव चव्हाण सोबत होतो आणि आहोत. ते म्हणजे आमचा पक्ष अशी भूमिका त्यांनी जाहिर केली अशोकराव व प्रतापराव यांच्यातील समन्वय “दुवा” कल्याणराव बानू शकतात
लोहा कंधार तालुक्यात देशाचे नेते स्व शंकरराव चव्हाण यांच्या काळात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता व्हायची.माणिकराव पाटील, व्यंकटराव मुकदम, विठ्ठलराव पवार, कल्याणराव सूर्यवंशी व समकालीन नेते त्याच्या सोबत कायमचे राहिले त्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या सोबतही या दोन्ही तालुक्यातील नेते राहिले परंतु प्रतापराव पाटील चिखलीकर आमदार झाल्या नंतर त्यांनी दोन्ही तालुक्यात ३० वर्षाच्या काळात आपले नेटवर्क प्रभावी तयार केले पर्यायाने हा भाग त्याचा बाल्लेकिल्ला बनला.
या काळात त्याचे जिवलग मित्र कॉग्रेसचे जेष्ठ कल्याणराव सूर्यवंशी यांनी मैत्री जोपासली पण पक्ष म्हणून त्यांनी काँग्रेस व अशोकराव चव्हाण यांचाच आपला नेता मानले. त्याच्या पासून ते कधीही दूर गेले नाहीत.अलीकडच्या काळात काही नव्याना संधी दिली तरीही त्यांनी कधीच खळखळ केली नाही. शिवसेना युती च्या काळात महसूल मंत्री असताना स्वता अशोकरावांनी कल्याण सावकार यांच्या पाठीवर थाप मारत तुम्ही पक्ष जिवंत ठेवला असे जाहीरपणे नमूद केले होते.
राज्याच्या राजकारणात मोठी घडामोडी झाल्या नंतर काँग्रेसचे ज्येष्ठ कल्याणराव यांनी पाहिल्यां जाहीर भूमिका घेत आपण अशोकराव चव्हाण यांच्या सोबत आहोत. त्याच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा कल्याणराव यांचा भूमिकेचे स्वागत केले. अशोकराव व प्रतापराव या दोन्ही नेत्यांत महत्वाचा दुवा म्हणून या पुढच्या राजकारणात कल्याणराव सुर्यवंशी यांची महत्वाची भूमिका राहणार असून, पुन्हा एकदा दोन्ही तालुक्याच्या राजकारणा चे लोह्यातील विश्वनाथ संकुल हे केंद्र स्थान ठरणार आहे असे दिसते.