नांदेडराजकिय

सिडको हडको परिसरात काँग्रेस पक्षाचे संघटन वाढले पाहिजे- आ.मोहनराव हंबर्डे

नवीन नांदेड। सिडको हडको परिसरात काँग्रेस पक्षाचे संघटन वाढले पाहिजे यात सर्व समाजातील नागरीकांना सहभागी करून शहरा पैक्षा वाघाळा ब्लॉक काँग्रेस कमिटी नावलौकिक झाली पाहिजे असे प्रतिपादन नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोहनराव हंबर्डे यांनी केले.

वाघाळा शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष पदी सतीश पाटील बसवदे यांची निवड झाल्याबद्दल संयोजक तथा आयोजक पंजाबराव देशमुख,अवतार सिंघ सोडी मित्र मंडळ यांच्या वतीने सिडको परिसरातील संभाजी चौक भागात १३ जानेवारी रोजी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमाला नांदेड दक्षिणचे आमदार मोहन अण्णा हंबर्डे , नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप जगताप,प्रभाग नगरसेवक प्रतिनिधी उदय देशमुख ,सामाजिक कार्यकर्ते सतिश भेंडेकर, माजी नगरसेविका डॉ.करूणा जमदाडे ,संदीप कदम
ज्येष्ठ नागरिक संघटनेचे विश्वनाथ शिंदे ,देविदास कदम, भि.ना. गायकवाड, रमेश तालीमकर , अनिल बेरजे, भालेराव , कविता चव्हाण भोसिकर, यांच्या सह प्रभागातील मधील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

सत्काराला उत्तर देतांना सतिश बसवदे यांनी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण व पक्षश्रेष्ठीनी टाकलेल्या विश्वासास पात्र राहील अशी ग्वाही सतिश बसवदे यांनी दिली, कार्यक्रम सुत्रसंचालन प्रसेनजित वाघमारे यांनी केले यावेळी उपस्थित मान्यवराचे स्वागत करण्यात आले, यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन पर भाषणे केले, आभार पंजाबराव देशमुख यांनी केले. कार्यक्रमास ऊतमराव भोसिकर, भारती रणवीर, मोरे, जोंधळे, प्रितम लिबेकंर, सचिन बारटके, राजु पाटील गिरे यांच्या सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!