नांदेड| कॉंग्रेस पक्षाला आरक्षणावर बोलण्याचा अधिकार नाही, 65 वर्षे सत्तेत राहूनही कोणत्याही समाजाला न्याय मिळवून दिला नाही. समाजासमाजात, धर्माधर्मात तेढ निर्माण करुन जनतेला यांनी संभ्रमित केले, असा आरोप भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. कॉंग्रेसने मतांच्या राजकारणासाठी लांगुनचालण करुन नीचपना केला.
महाविजय-2024 अभियानंतर्गत श्री बावनकुळे यांनी नांदेड लोकसभा क्षेत्रात प्रवास केला. त्यावेळी ते माध्यमांशी संवाद साधत होते. श्री बावनकुळे म्हणाले, मुख्यमंत्री शिंदे यांनी छत्रपतींच्या साक्षीने मराठा समाजाला आरक्षण देण्याचे वचन दिले आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा. मराठा समजला आरक्षण मिळावे ही भाजपची भूमिका आहे. मागच्या सरकारला न्यायालयात आरक्षण टिकविता आले नाही, असाही टोला त्यांनी लगावला.
मागच्या सरकारच्या काळात काही चुकीचे झाले असेल म्हणून मुख्यमंत्री बोलले असतील, मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख असतात, त्यांच्याकडे सगळी माहिती असते. मागच्या काळात काय काय झाल याचा रिपोर्ट असतो, त्या रिपोर्टच्या आधारे मुख्यमंत्री बोलले असतील, असेही श्री बावनकुळे म्हणाले.
• भाजपाच्या निषेध आंदोलनात सहभाग
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा कॉंग्रेससह विरोधी पक्षांनी अपमान केला आहे. संवैधानिक पदाचा अपमान केल्याचा भाजपाने राज्यभर निदर्शने करून निषेध नोंदविला. प्रदेशाध्यक्ष श्री बावनकुळे नांदेडच्या मुथा चौकात भाजपा व भाजयुमो कार्यकर्त्यांसह आंदोलनात सहभागी झाले व मर्यादा न पाळणाऱ्या विरोधकांचा जोरकस निषेध केला.
• नांदेडसह ४५ जागांवर विजय मिळविणार
नांदेड लोकसभा प्रवासात मुखेड येथे देगलूर, नायगाव व मुखेड या तीन तर नांदेड येथे नांदेड उत्तर, नांदेड दक्षीण आणि भोकर विधानसभा क्षेत्रातील सुपर वॉरियर्स तथा पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. सुपर वॉरियर्स हे भाजपाच्या विजयाचे शिल्पकार आहेत. त्यांच्या प्रयत्नाने आगामी लोकसभा निवडणुकीत नांदेडसह महाराष्ट्रातील ४५ हून अधिक जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून येतील अशा विश्वास व्यक्त केला. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार व राज्यातील महायुती सरकारच्या जनकल्याणकारी योजनांचा लाभ समाजातील अखेरच्या घटकांपर्यंत पोहचविण्याचे आवाहन केले.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अजित गोपछडे, प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर, खा. प्रतापराव पाटील चिखलीकर, संघटनमंत्री संजय कौडगे नांदेडचे जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे, आ. राम पाटील रातोळीकर, आ. डॉ. तुषार राठोड, आ. राजेश पवार, प्रदेश सचिव किरण पाटील, माजी आ. सुभाष साबणे, देविदास राठोड, डॉ. माधव पाटील, प्रवीण पाटील अन्य मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.