
नांदेड। टेनिस बॉल क्रीकेट असोसिएशन ऑफ नांदेडच्या वतीने दि. ८ ऑक्टोंबर २०२३ वार रविवार रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ वा. या वेळेत व्यंकटराव तरोडेकर हायस्कूल कल्याण नगर नांदेड मैदान येथे जिल्हा टेनिसबॉल क्रीकेट संघ निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे.
सदरील निवड चाचणीत मिनी सबज्युनियर १४ वर्षा खालील मुले व मुली आणि सबज्युनियर १७ वर्षा खालील मुले व मुली सहभाग नोंदवू शकतात. या निवड चाचणीत निवड झालेले खेळाडू टेनिस बॉल क्रीकेट असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व हिंगोली जिल्हा टेनिस बॉल क्रीकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १४ ते १६ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत हिंगोली येथे आयोजित होणार्या मिनी सबज्युनियर आणि सबज्युनियर राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रीकेट चॅम्पीयनशीप या स्पर्धेत नांदेड जिल्हा टेनिसबॉल क्रिकेट संघाचे प्रतिनिधीत्व करतील.
या निवड चाचणीत सहभाग नोंदवितांना खेळाडूंनी ३ पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड, जन्म दाखल्याचा पुरावा किंवा शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र सोबत आणावे. निवड चाचणीत जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवावा असे आवाहन टेनिस बॉल क्रीकेट असोसिएशन ऑफ नांदेडच्या वतीने करण्यात आले आहे.
