नांदेड

बाभुळगाव ग्रामपंचायत अंतर्गत स्मशान भुमी व जिल्हा परिषद शाळा परिसरात वृक्षारोपण..

नवीन नांदेड l बाभुळगाव ग्रामपंचायत कार्यालय अंतर्गत सरपंच पुंडलिक पाटील मस्के व ग्रामपंचायत सदस्य व गावकरी,जिल्हा परिषद शिक्षक,अंगनावाडी ताई, मदतनीस यांच्या उपस्थितीत स्मशान भुमि व जिल्हा परिषद शाळा प्रांगणात विविध वृक्ष लागवड करून वृक्षारोपण करण्यात आले.

गावात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्याचा संकल्प ग्रामपंचायत कार्यालय यांच्या कडून करण्यात आल्यानंतर २३ जुलै रोजी गावातील स्मशान भुमि परिसरात व जिल्हा परिषद शाळा प्रांगणात सरपंच पुंडलिक पाटील मस्के पाटील ग्रामसेवक रमेश कदम, मुख्याध्यापक सर्जे,ग्राम पंचायत सदस्य काळेश्वर मस्के,अंगणवाडीताई, मदतनीस,सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी नागोराव मोरे, माधव जाधव, भगवान मस्के ,बाळू लांडगे,बंडू तेलंगे,दशरथ पांचाळ,दता मस्के,यांच्या सह गावकरी,युवक ,महिला मोठया संख्येने उपस्थित होते, या वेळी वृक्ष संगोपन जबाबदारी जिल्हा परिषद शाळा शिक्षक व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी घेतली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!