हिंगोली/नांदेड। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अधिकृत उमेदवार कॉ.विजय रामजी गाभने यांच्या उमेदवारीने १५ हिंगोली लोकसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार असून माकप चमत्कार दाखविण्याची शक्यता नाकारता येत नाही असे मनोगत माकप राज्य सचिव प्रा.डॉ.कॉ. उदय नारकर यांनी व्यक्त केले.
दि.८ एप्रिल पासून राज्य सचिव डॉ. नारकर हे हिंगोली मतदार संघात तळ ठोकून आहेत. ८ एप्रिल रोजीच्या मेळाव्यात माकप पॉलिट ब्युरो सदस्य व अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.अशोक ढवळे,किसान सभेचे राष्ट्रीय सहसचिव कॉ.डॉ.अजित नवले, माकप राज्य सचिव मंडळाचे सभासद कॉ.किसन गुजर यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंगोली येथील रामाकृष्णा हॉटेलमध्ये मतदार संघातील प्रमुख कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा घेण्यात आला.
त्यावेळी माकप राज्य कमिटी सभासद कॉ.उद्धव पौळ, राज्य कमिटी सभासद व नांदेड जिल्हा सचिव कॉ.शंकर सिडाम,कॉ.अंकुश बुधवंत, कॉ.सुरेश काचगुंडे, कॉ. उज्वला पडलवार, कॉ.गंगाधर गायकवाड, कॉ.प्रल्हाद चव्हाण, कॉ. जनार्धन काळे, कॉ.दिगंबर काळे,कॉ. शेख नशीर, कॉ.करवंदा गायकवाड, कॉ.लता गायकवाड आदींनी मनोगत व्यक्त करीत काही सूचना केल्या. दि.१२ एप्रिल पासून मतदार संघात विविध ठिकाणी मेळावे घेण्यात आले असून त्यामध्ये प्रामुख्याने इस्लापूर,माहूर, महागाव आणि हिंगोली येथील मेळाव्यास मोठा प्रतिसाद मिळाला.
हिंगोली लोकसभा मतदार संघातील औंढा – कळमनुरी विधानसभा मतदार संघामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने चार वेळा विधानसभा जिकंलेली आहे आणि दिवंगत स्वातंत्र्य सैनानी कॉ. विठ्ठलराव नाईक यांनी वीस वर्ष आमदार म्हणून प्रतिनिधीत्व केले आहे. माहूर – किनवट मतदार संघामध्ये भाकपने मुसंडी मारत आदिवासी व डोंगराळ गड जिकूंन दिवंगत कॉ.सुभाष जाधव यांनी आमदार म्हणून प्रतिनिधीत्व केले आहे.
उमरखेड विधानसभा मतदार संघातील महागाव पंचायत समिती जिकूंन सत्ते मध्ये येत कॉ.ऍड.डी.बी.नाईक हे सभापती राहिलेले आहेत. महागाव तालुक्यातील धडाडीचे कार्यकर्ते कॉ. देविदास मोहकर यांनी जिल्हा परिषद गटाची निवडणूक जिंकून सामान्य जनतेला न्याय देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. याशिवाय कॉ.अर्जुन आडे, कॉ. किशोर पवार,कॉ. चंपतराव नाईक,कॉ.प्रसराम पारडे,उत्तम पुंडगे, स्टॅलिन आडे, कॉ.राजकुमार पडलवार,कॉ. कादर खान, कॉ. कैलास भरणे,कॉ.नंदकिशोर मोदुकवार आदी सह शकडो कार्यकर्ते तनमन धनानाने प्राचारार्थ कामाला लागले आहेत.
उपरोक्त एकंदरीत परिस्थितीमुळे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आणि डाव्या आघाडीचे अधिकृत उमेदवार कॉ.विजय गाभने हे इतर उमेदवारा पेक्षा प्रचारमध्ये आघाडीवर आहेत. आणि त्यांच्या उमेदवारी मुळे हिंगोली लोकसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार आणि माकप यावेळी निवडून येण्याचा चमत्कार घडवेल असे मनोगत डॉ.उदय नारकरांनी माहूर येथे केले आहे. अशी माहिती उमेदवार प्रतिनिधी कॉ. गंगाधर गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.