नांदेडलाईफस्टाईल
बौध्दाचार्य प्रमाणपत्र परीक्षा संपन्न
नांदेड| भारतीय बौद्ध महासभा नांदेड उत्तर शाखेतर्फे आज झालेल्या बौध्दाचार्य प्रमाणपत्र परीक्षेस २५ परीक्षार्थींनी उपस्थी दर्शवून लेखी व मौखिक परीक्षा दिली. मुख्य परिक्षक म्हणून मुंबई कार्यालयातर्फे आयु. सी.बी तेलतुंबडे तर लातूर येथून आयुनी.दैवशाला गायकवाड ह्या उपस्थित होत्या.
भीमघाट नालंदा बुध्द विहार येथे आज सकाळी ११ वा.नांदेड दक्षिण बौध्द महासभा अध्यक्ष पी एम वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्घाटनास नांदेड उत्तर महासभा सरचिटणीस रविकिरण जोंधळे, विभागीय सचिव संबोधी सोनकांबळे सा.ना. भालेराव तसेच महासभेचे माधव सरपे, युवराज मोरे सुभाष नरवाडे प्रसाद शहाणे अप्पाराव येरेकार नारायण वाघमारे तेलंगणा आदी उपस्थित होते.महाराष्ट्रात आज एकाचवेळी सर्व जिल्ह्यात परीक्षा घेण्यात आली.