नवीन नांदेड। ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत गतवर्षीच्या तुलनेत खुनाचा घटनेत घट झाली असून मागील वर्षी १३ खुनाच्या तुलनेत यावर्षी दाखल असलेल्या १० गुन्हे पैकी ०९ गुन्हे उघडकीस आणुन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जवळपास ७८९ समाजकंटका सह गुन्हेगारावर कार्यवाही करुन प्रतिबंधात्मक कार्यवाही केली असुन एकुण दाखल झालेल्या६५६ गुन्हा पैकी ४८९ गुन्हे उघडकीस आणल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप यांनी दिली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे , अतिरिक्त पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार यांच्या आदेशानुसार व पोलीस उपविभागीय अधिकारी सुशिल कुमार नाईक यांचा मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप यांनी व संबंधित पोलीसअधिकारी,ऊपनिरीक्षक ,अमलदांर यांच्या कडे देण्यात आलेल्या तपासातील गुन्हायात गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी सन २३ मध्ये एकुण गुन्हे जवळपास ६५६ दाखल करण्यात आले असून त्यापैकी ४८९ गुन्हे उघडकीस आणले असुन खुन ३०२ कलमात दहा दाखल असुन उघड ९ झाले आहेत तर खूनाचा प्रयत्न १५ दाखल व उघड १५, सदोष मनुष्य वध कलमान्वये एक दाखल एक ऊघड तर ,जबरीसंभोग कलम अंतर्गत १६ दाखल व उघड १६ झाले आहे, दरोडा गुन्हायात ७ दाखल व उघड सात झाले आहेत.
जबरी चोरी गुन्हयात २१ दाखल पैकी १७ तपास झाले आहेत. घरफोडी गुन्हायात २७ दाखल पैकी २ उघड, सर्व चोरी गुन्हायात १७३ दाखल पैकी ५१ उघड, दंगा गुन्हायात १३ दाखल १३ तपास करण्यात आले , विश्वास घात १ दाखल १ उघड, ठकबाजी ४२० गुन्हायात ४ दाखल ४ उघड, पळवून नेणे ३६३ कलमा मध्ये २० दाखल १४ उघड, घराविषयी आगळीक ७ दाखल सात उघड, अ प्रकिया एक दाखल एक उघड, दुखापत १६२ दाखल १६० उघड, सरकारी नोकरावर हल्ला ९ दाखल न ऊ ऊघड, विनयभंग १८ दाखल १८ ऊघड, अपघात मृत्यू ३२ दाखल ३० ऊघड, ४९८ हुंडाबळी गुन्हायात ५० दाखल ५०झाले असुन तपास पूर्ण झाले आहेत. ईतर भादवी ६९ दाखल पैकी ६४ ऊघड, एकुण गुन्हे ६५६ दाखल असुन ४८९ ऊघड झाले आहेत.
एकुण प्रतिबंधात्मक कार्यवाही मध्ये गतवर्षी ६२७ जणावर कार्यवाही करण्यात आले आहे यावर्षी ७८९ जणावर कार्यवाही करण्यात आली आहे, *३१ ऑक्टोबर* रोजी ग्रामीण पोलीस स्टेशन प्रभारी पदभार घेतल्यानंतर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहरी व ग्रामीण भागात रात्रपाळी गस्त सह अनेक भागात पोलीस बंदोबस्त ठेवुन महामार्ग असलेल्या नांदेड लातूर रोड लातूर फाटा व नांदेड हैदराबाद रोडवरील चंदासिंग चौकात पोलीस कार्यान्वित करून दैनंदिन वाहतूक सुरळीत करून ऊपनिरीक्षक , पोलीस अंमलदार, होमगार्ड यांच्या शहरी व ग्रामीण भागात दैनंदिन व रात्रपाळी बंदोबस्त ठेऊन गस्त वाढविण्यात आल्यामुळे गुन्हेगारावर आळा बसला असल्याचे जगताप यांनी सांगितले.