नांदेड़। येणाऱ्या मान्सूम पूर्व उपाययोजना करण्यासाठी नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भेंडेगाव व पळशी येथील बंधारा ची पाहणी करून थोड़े काम बाकी असलेल्या कामाना लवकर करण्याचे आदेश आमदार मोहनराव हंबडे यांनी दिले आहे.
महाविकासआघाडी सरकारच्या काळात दोन मोठे बंधारे मंजूर झाले. त्यापैकी एकाचे काम अंतिम टप्प्यात असून दुसऱ्या बंधाऱ्याचे प्रगती पथावर आहे. सदर प्रकल्प पूर्णत्वास आल्यानंतर या भागातील पिण्याच्या पाण्याचे व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचे आणि शेती विषयक सर्व प्रश्न मार्गी लागणार असून, महाविकास सरकारच्या काळात नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात वाजेगाव सर्कल, बळीरामपुर सर्कल, सोनखेड सर्कल भागात असे असंख्य बंधारे मंजूर करून आणले असून सदरील बंधाऱ्यांचे काम प्रगतीपथावर आहे. या बंधाऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न सोडवताना निश्चितच एक वेगळ समाधान होत असल्याचे आमदार मोहन अन्नअन् हबर्डे यांनी सांगितले.