लोहा| शहर व तालुक्यात शुक्रवारी भल्या पहाटे दोन वाजल्या पासून धुवाधार पाऊस सुरू झाला पहाटे साडे पाच वाजेपर्यंत हा पाऊस सुरू होता त्यामुळे शहरातून वाहणाऱ्या दोन्ही नदीला महापूर आला.५० वर्षा नंतर पहिल्यांदाच शहरात पुरामुळे हाहाकार उडाला .जुन्या शहरातील कलाल पेठ, साठे ,गल्ली, नवीन गोल्डन सिटी,सिद्धार्थ नगर येथे ढगफुटीच्या पावसाने मोठी हानी झाली.घरातपाणी शिरले, जीवनो पयोगी साहित्य, तसेच चारचाकी, दुचाकी ,पाणी ट्रँकर वाहून गेले. या पुराच्या पावसाचा हाहाकार पाहता भल्या सकाळीच आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी शहरातील विविध भागात जाऊन आपतिग्रस्त नागतिकांशी संवाद साधला त्याचे म्हणणे जाणून घेतले. तसेच सरकार आपल्या सोबत आहे. सर्वतोपरी सहकार्य करू असे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पुरग्रस्त भागातील जनतेला आश्वासित केले.

लोहा शहरात शुक्रवारी भल्या पहाटे दोन वाजल्या पासून ढगफुटी सदृश्य पावसामुळे हाहाकार उडाला. सकाळी साडे पाच सहा वाजे पर्यंत झालेल्या पावसामुळे जुन्या शहराला पुराचा वेढा पडला. तर शहरातून वाहणाऱ्या दोन्ही नदीला पूर आला जुन्या भागातील कलालपेठ, साठे गल्ली, विस्तारीत पवार गल्लीचा भाग, गोल्डन सिटी जायकवाडी वसाहतीचा परिसर या भागात पुरमुळे घरात पाणी गेले . जीवनोपयोगी साहित्य वाहून गेले गोल्डन सिटी भागात चार चाकी, दुचाकी वाहून गेले.

आमदार चिखलीकर सकाळीच लोहयात पूरग्रस्त भागात
लोहा शहरातील ढगफुटीमुळे हाहाकार उडाला त्या भागात सकाळीच आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पूरग्रस्त भागात गेले जुन्या शहरातील कलालपेठ, साठे गल्ली , जायकवाडी परिसर भागात नागरिकाच्या झालेल्या नुकसानीचे पाहणी केली. आपल्या सोबत मी आहे काळजी घ्या.सुदैवाने या पुरात कोणीही जीवितहानी झाली नाही जीवनावश्यक साहित्याचे नुकसान झाले घरात पाणी गेले ,घर पडले, त्याचे पंचनामे करावेत असा सूचना प्रशासनास दिल्या. यावेळी तहसीलदार परळीकर, मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे, माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार, केशवराव मुकदम , रामराव सूर्यवंशी, छत्रपती धुतमल, करीम शेख , भास्कर पाटील, अनिल धुतमल,पोलीस निरीक्षक आयलाने, बी डी जाधव ,तलाठी गाढे पाटील, यासह पदाधिकारी उपस्थित होते पूरग्रस्त भागात जेवण व्यवस्था करण्याचे निर्देश दिले.
मुख्याधिकारी लाळगे व टीम मदतीला धावली
शहरात उदभवलेल्या पूरपरिस्थितीची सकाळीच मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे यानी पाहणी केली. लोकांशी संवाद साधला सकाळी पाच वाजल्या पासून शहराच्या वेगवेगळ्या भागात ते गेले. त्यानी लोकाना दिलासा दिला, माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम, माजी उपनगराध्यक्ष शरद पाटील, माजी उपनगराध्यक्ष छत्रपती धुतमल, माजीउपनगराध्यक्ष दता वाले, माजी नगरसेवक करीम शेख, माजी नगरसेवक संभाजी चव्हाण, भास्कर पवार, हरिहर धुतमल, अनिल धुतमल, रत्नाकर महाबळे, इमाम लदाफ कार्यालयीन अधीक्षक कठाळे वैजनाथ शेटे यासह नगरपालिका कर्मचारी यांनी लोकांना मदत केली. मुख्याधिकारी यांनी तसेच करीम शेख, संभाजी चव्हाण यांनी पूरग्रस्त भागात खिचडी पाणी बॉटल दिल्या. तर जिल्हा परिषद हायस्कूल शाळेत सिद्धार्थ नगरातील लोकांची राहण्याची सोय केली.

एसडीएम गोरे, तहसीलदार परळीकर यांनी केली पाहणी
उपविभागीय अधिकारी रामेश्वर गोरे, तहसीलदार परळीकर यांनी सकाळीच जुन्या शहरातील भागात जाऊन पाहणी केली. स्मशानभूमीलगत दुकाने वाहून गेली वाहने वाहून गेली त्याची माहिती घेतली पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.
तरुणांनी अनेकांचे जीव वाचविले
पहाटे साडे तीन चार वाजता जुन्या शहरातील कलालपेठ भागात पुराने घरांना वेढा घातला जवळपास बारा घरात पाणी शिरले. त्याच वेळी छाती इतक्या पाण्यात स्वतःचा जीवाची पर्वा न करता अमर लदाफ, अफरोज लदाफ, सरफराज लदाफ, साहिद लदाफ, शब्बीर इस्माईल लदाफ, फैयाज लदाफ, इम्रान हुसेन लदाफ,अनिल धुतमल यांनी पुरात अडकलेल्या कुटुंबाना सुरक्षित स्थळी त्याचवेळी हलविले व त्याचे प्राण वाचविले असा तरुणांचे प्रशासनाने नोंद घ्यायला हवी.
