
नांदेड| गावात स्वच्छता असेल तर आरोग्य अबाधित राहते आणि सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनातून गावाचा कायापालट होतो. मात्र, हे साध्य करण्यासाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन अर्धापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी डी. एस. कदम यांनी केले. अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव येथे आज स्वच्छता संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाला जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक मिलिंद व्यवहारे, विस्तार अधिकारी व्ही. एम. मुंडकर, एस. पी. गोखले, एन. बी. सूर्यभान, नरेगाच्या सहाय्यक कार्यक्रमाधिकारी प्रतिभा गोणारकर, गट समन्वयक राजेश जाधव, सरपंच प्रतिनिधी शिवाजी खंडागळे, उपसरपंच संतोष कल्याणकर, तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात महादेव मंदिरात ग्रामस्थांना तसेच शाळेत विद्यार्थ्यांशी गट विकास अधिकारी कदम यांनी स्वच्छतेविषयी संवाद साधला. अर्धापूर तालुक्यातील सर्व गावांमध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आले असून, गावांना शाश्वत स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ओला व सुका कचरा व्यवस्थापनासाठी सार्वजनिक कचराकुंड्या व वैयक्तिक डस्टबिन ठेवण्याचे तसे घंटागाडीच्या माध्यमातून कचरा विलगीकरण करण्याचे आवाहन त्यांनी केले. उघड्यावर कचरा व सांडपाणी टाकू नये याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली, ज्या अंतर्गत ग्रामस्थांना घरोघरी भेट देऊन स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. यानंतर सामूहिक स्वच्छता मोहिमेद्वारे गावाची स्वच्छता करण्यात आली. गट विकास अधिकारी कदम यांनी, गावे हागणदारी मुक्त झाल्यानंतरही त्यांची शाश्वत स्वच्छता टिकवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन केले. यासाठी वैयक्तिक व सार्वजनिक शौचालये, सांडपाणी व्यवस्थापन, शोषखड्डे, बंदिस्त नाली आणि घनकचरा व्यवस्थापनावर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक मिलिंद व्यवहारे यांनी गाव दृश्यमान स्वच्छ ठेवण्यासाठी ग्रामस्थांनी यात सक्रिय भूमिका बजवावी, असे आवाहन केले.
या कार्यक्रमाला उद्धवराव कल्याणकर, गोविंदराव कल्याणकर, प्रवीण दुधमल, दिगंबर गिरी, वसंतराव कल्याणकर, बालाजी कल्याणकर, बालाजी बंबरुळे विस्ताराधिकारी सोनटक्के, पुंडलिक थोरात, कपिल दुधमल, कैलाश कल्याणकर, ललिताबाई, गाजलवाड, मिनाबाई दुधमल, पंचशीला सदावर्ते, विश्वनाथ कल्याणकर, संगीता केदारे, मीरा भेंडे, नरसाबाई बोडके, रोहिदास कल्याणकर, गायत्री देशमुख, दीपक कल्याणकर ,ओंकार कल्याणकर, मुख्याध्यापिका संगीता इंगोले, प्रकाश जाधव, अर्धापुरकर मॅडम, रमेश राजुरे, संजय हंकारे, सुरेश गायकवाड, शोभा खैरनार, सुरेखा भुरेवार, चव्हाण, दादजवार सर यांच्यासह महिला भगिनी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
