
उस्माननगर,माणिक भिसे। उस्माननगर येथील सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे ढीग व नाल्यात कचरा अडकून सर्वत्र दुर्गंधी पसरत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.पावसाळ्यापूर्वी येथील विविध ठिकाणच्या नालीतील घाण साचलेली काढावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
येथील ग्रामपंचायत सदस्य संख्या ही पंधरा सदस्यांची असून सरपंच हे सर्वसाधारण महीलेला असल्याने विद्यमान सरपंचांनी राजीनामा दिल्याने दुसऱ्या गटातील सदस्यांनी बहुमत करून भाजपच्या ताब्यात आहे.
मागील अनेक महीन्यापासून प्रशासनाने मनावर ताबा ठेवून स्वच्छताकडे दुर्लक्ष करून गावातील नाल्या केर कचऱ्याने तुडुंब भरून दुर्गंधी पसरत आहे.तर काही ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहे. शासन लाखो रुपये स्वच्छतेवर खर्च करीत आहे. स्थानिक प्रशासन कि तालुका स्तरावरील प्रशासन सफाई कामगारांची नेमणूक करण्यासाठी पुढ येत नसल्याने गावातील सफाईकडे दुर्लक्ष होत आहे. जागोजागी कचऱ्याचे ढीग व नाल्याच्या काठावर,नालीत घाण साचून दुर्गंधी पसरली आहे.
यामुळे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच विविध आजार उद्भवतात आहेत. दरवर्षी शासन स्वच्छता साठी पैसे खर्च करतो. पण नागरिकांनी संबंधितांना विचारले तर सफाईकडे पैसे नाहीत किंवा मजुरांदार मिळत नाही , म्हणून वेळ काढून धन्यता मानतात. येथील लोकसंख्या तालुक्यातील इतर ग्रामपंचायत पेक्षा जास्त आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने तात्काळ नालीतील घाण साचलेली व कचऱ्याचे ढीग उचलून न्यावेत अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
