नवीन नांदेड परिसरात विकसित भारत संकल्प यात्रेत विविध योजनांचा नागरिकांनी घेतला लाभ
नवीन नांदेड| शासन आपल्या दारी या योजने अंतर्गत नांदेड वाघाळा महानगरपालिका च्या वतीने विकसित भारत संकल्प यात्रा रथाचे 24 ते 30 डिसेंबर पर्यंत असून यात शासनाच्या विविध योजनेची माहिती आयुक्त महेश कुमार डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम व उपायुक्त डॉ. पंजाबराव खानसोळे यांच्या आदेशावरून सिडको क्षेत्रीय सहायक आयुक्त संभाजी कास्टेवाड यांनी दि 24 व 25 डिसेंबर दरम्यान हडको व कौठा परिसरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या वेळी नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद नोंदविला. यावेळी महिला यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
नांदेड जिल्ह्यतुन या विकसित भारत सरकार च्या वतीने दि 24 डिसेंबर रोजी हडको येथे छत्रपती शिवाजी महाराज प्रांगण, व 25 रोजी रवि नगर कौठा येथे संकल्प रथाचे आगमन झाले होते, यावेळी प्रथम शपथ देण्यात आली, अतिरीक्त आयुक्त गिरीश कदम यांच्या हस्ते नागरीकांना आयुष्यमान भारत कार्ड आधार कार्ड व छोटे व्यवसायीक यांना कर्ज कसे मिळेल याचे मार्गदर्शन करण्यात आले, तर प्रधानमंत्री सुरक्षा विमा ,जीवन ज्योत विमा ,प्रधानमंत्री जनधन योजनाश्रम योगी मानधन योजना ,मात्र वंदना योजना यांची माहिती देण्यात आली.
यावेळी मुख्य वैधकीय अधिकारी डॉ. बिसेन ,प्रकाश कांबळे, माजी नगरसेवक राजू काळे पाटील ,सुर्यवंशी, डॉ अब्दुल शमी, सिडको क्षेत्रीय कार्यालयचे सहाय्यक आयुक्त संभाजीराव कास्टेवाड, कार्यालय अधिक्षक विलास गजभारे, मनपाचे अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती ,कार्यक्रम यशस्वीतेसाठी सिडको क्षेत्रीय कार्यालयाचे स्वच्छता निरीक्षक किशन वाघमारे, अजून बागडी, कर निरीक्षक प्रभु गिराम यांच्या सह मातृ सेवा आरोग्य केंद्र,परिचारीका,आशा वकर् अधिकारी कर्मचारी, वसुली लिपीक,यांची उपस्थिती होती.