नांदेड शहरातील शिवनगर येथील विद्युत रोहित्र ना दुरस्तीमुळे नागरिक हैराण
नांदेड। नांदेड शहरातील शिवनगर येथील विद्युत रोहित्र 202 हे अनेक दिवसापासून सतत खराब होत असून त्या वरील विद्युत भार अधिक असल्यामुळे सतत लाईट जाते तसेच कमी दाबाच्या प्रवाहामुळे अनेकांच्या घरातील विद्युत उपकरणे खराब होत आहेत.
शिवनगर येथील रहिवासी यांनी अभियांत्याकडे अनेकवेळा तक्रार करून देखील या कडे महावितरण विभाग लक्ष देत नाही.
सध्या उन्हाळ्याचे दिवस असून प्रचंड उन्हाचा उकाडा आहे त्यात सततच्या लाईट ये जा मुळे लहान मुले आजारी व्यक्ती हैराण होत आहेत.
यासंदर्भात अनेकवेळा लेखी तक्रार उप अभियंत्यांना देऊन या कडे दुर्लक्ष केल्या जात आहे.तसेच भर वस्तीत असलेले हे रोहित्रचे दार नेहमी उघडे असते या मुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महावितरण विभाग हे महिन्याचे लाईट बिल वसुली साठी सक्ती दाखवते व तत्परता दाखवते मग असे विद्युत रोहित्र दुरुस्ती करून लोकांच्या अडचणी का दूर करत नाही असा सवाल नागरिक करत आहेत.