सिडको हडको परिसरातील स्वस्त धान्य दुकानात राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने प्रमाणे मिळत नाही, तक्रार
नवीन नांदेड| सिडको हडको परिसरातील स्वस्त धान्य दुकानातून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने प्रमाणे राशन मिळत नाही व दिलेल्या मॅसेज नुसार राशन संबधित दुकानदार देत नसल्याची तक्रार तहसीलदार नांदेड व पुरवठा अधिकारी यांना निवेदनाद्वारे प्रत्यक्ष भेटुन केली आहे.
सिडको हडको रहिवासी राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेप्रमाणे राशन मिळत नाही अथवा मेसेज प्रमाणे राशन दुकानदार राशन देत नाही,अनेक वर्षापासून ऑनलाईन राशन कार्ड होत नाहीत तरीही त्वरित करून देणे व लाभार्थ्यांना लाभ मिळवून द्यावे हीच अपेक्षा, राशन दुकानदार संवाद साधताना आम्हास असे सांगण्यात येते की किमान आपल्या कुटुंबास वीस किलो राशन शासनाने दिले आहे त्यास आपणास राशन मिळते किंवा आपले कुटुंब विभक्त करावे असे सांगण्यात येत आहे , शासनाचा जीआर असेल तो जाहीर करावा.
आम्हास राशन दुकानातून राशन घेतल्यानंतर त्या मालाची वजन पावती प्रत्येकास मिळावी यापुढे ग्राहक व दुकानांमधील वाद होणार नाही याबाबत आपण ताकीद दयावी अशी मागणी प्रमोद काशिनाथराव मैड ,माजी उपशहर प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नांदेड, दता बाबुराव पुयड, कैलास मोरलवार,आंनद भाले, सुर्यकांत पांचाळ,सुरेश मोरे,बसवेश्वर गाढे,विजय सोनटक्के,यांनी केली आहे.