सिडको मध्यवर्ती उदयान दुरवस्था,मनपा प्रशासना कडून पाहणी, अंदाजे तिन कोटी रूपये तरतूद..
नवीन नांदेड l सिडको परिसरातील एकमेव असलेल्या मध्यवर्ती उदयाण गेल्या अनेक दिवसांपासून दुरावस्थेत असुन नागरीकांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत मनपा आयुक्त डॉ. महेश कुमार डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने पाहणी करून माहिती घेतली असल्याचे वृत्त असुन जवळपास सुशोभीकरण साठी तिन कोटी रुपये तरतूद करण्यात आल्याचे वृत्त आहे.
नवीन नांदेड भागातील जेष्ठ नागरिक, युवक, महिला, बाल गोपाळ साठी असलेले एकमेव मध्यवर्ती उदयाण मनपा प्रशासनाने साकारून लाखो रुपये निधी खर्च करून वृक्ष, विधुत, खेळणी सह विविध साहित्य साकारले होते, एकमेव व देखणे उधाण असतांना कालांतराने संरक्षक भिंत कोसळली व पडझड सुरू झाली आणि दुरावस्था होत गेली आणि खेळणी, वृक्ष, विधुत साहित्य रातोरात गायब झाले, व मोठ्या प्रमाणात नासाडी झाल्याने नागरीकांना मात्र उधाण अभावी इतरत्र फेरफटका मारावा लागला, या बाबत अनेक वृतमान पत्रात बातम्या प्रसिद्ध झाल्या, अखेर मनपाचे आयुक्त डॉ. महेश कुमार डोईफोडे यांनी या बाबत उदयाण, बांधकाम,विधुत विभाग यांच्यासह इतर अधिकारी यांच्यी संयुक्त बैठक घेऊन पाहणी करण्याचे आदेशीत केले.
गेल्या विस दिवसापूर्वी मनपा कार्यकारी अभियंता शिवाजी बाबरे, उदयाण विभागाचे डॉ. बेग,विधुत विभागचे सय्यद, कनिष्ठ अभियंता किरण सुर्यवंशी यांच्या सह संबंधित विभागाचे अधिकारी यांनी संयुक्त पाहणी करून नव्याने संरक्षण भिंत, वृक्ष लागवड, विधुत दिवे, शौचालय, वॉचमन रूम, रंगरंगोटी, यासह अनेक कामाचा समावेश करण्यात आला असून जवळपास तिन कोटी रुपये तरतूद करण्यात आल्याचे विश्वासनिय वृत्त असुन आयुक्त यांच्या कडे संचिका पाठवली असून मंजुरी मिळताच कामांना सुरूवात होणार असल्याचे वृत्त आहे. या व्यतिरिक्त परिसरातील अनेक ठिकाणी दुरावस्थेत असलेले उदयाण ही लवकरच विकसित होणार असल्याचे समजते.