श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| गणेश उत्सव आणि ईद- ए -मिलाद हे दोन्ही सण यावर्षी एकाच कालावधीत आले आहेत.हे दोन्ही सण साजरे करतांना सर्व धर्मीयांनी परस्पर सौहार्द व शांततेला गालबोट लागणार नाही, याची काळजी घेऊन एकोप्याने व आनंदाने सण साजरे करावेत, असे आवाहन सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधवर यांनी केले आहे.
पर्यावरणपूरक,शिस्तीत व उत्साहात गणेशोत्सव आणि ईद- ए -मिलाद साजरा करण्यासाठी सिंदखेड पोलीस प्रशासनाची पूर्ण तयारी झाली असून जनतेने यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन जाधवर यांनी केले आहे. समाजातील सर्व घटकातील सर्व धर्मातील जातीतील उत्सव आपण एकोप्याने साजरे करावे.
तसेच प्रत्येकाने आपल्या घरातील तरुण मंडळींना योग्य मार्गदर्शन केल्यास व त्यांच्याकडून उत्साहा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घेतल्यास सर्व धर्मीयांचे सण उत्सव हे शांततापूर्ण उत्साहात साजरे होतील, उत्साह दरम्यान कायदा हातात घेणाऱ्यांना पोलीस प्रशासन पाठीशी घालणार नाही.असा इशारा जाधवर यांनी दिला आहे.