
हिमायतनगर| शौच्चालयास गेलेल्या एका विवाहितेचा साप चावल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना दि.२० रोजी हिमायतनगर तालुक्यातील आंदेगाव येथे घडली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 20 रोजी दुपारी ०१ वाजेच्या सुमारास, मौ. आंदेगाव ता. हिमायतनगर जि. नांदेड येथे, यातील मयत नामे सौ. सुनीता आडेलु कुठेवाड, वय 30 वर्षे, ही स्वछास गेली असता कोणतातरी विषारी साप चावल्याचे तीने घरी येवुन साप चावला आहे असे सांगीतले.
तिचे तोंडातुन फेस येत असल्याने ती झोपली व झोपतच तिचा मृत्यू झाला. अशी खबर आडेला नबा कुठेवाड, वय 40 वर्षे, व्यवसाय मजुरी रा.आंदेगाव ता. हिमायतनगर जि. नांदेड यांनी दिल्यावरुन पोस्टे हिमायतनगर आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपस पोलीस निरीक्षक बी डी भुसनूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोना. सुरकुंटे, मो.नं. 9112902909 हे करीत आहेत.
