
हदगांव/नांदेड| इयत्ता दहावी वर्गात शिक्षण घेणाऱ्या एका मुख्याध्यापकाने विद्यार्थीला गुंगीचे औषध देऊन बलात्कार केला आहे. त्यामुळे अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली असताना नांदेड येथे नेऊन चक्क गर्भपात घडवून आणला आहे. या प्रकरणी जिल्ह्यातील हदगांव तालुक्यातील तामसा पोलीस ठाण्यात संबंधित मुख्याध्यापकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेच्या निषेधार्थ नागरिकांनी बाजारपेठ बंद ठेऊन कठोर कार्यवाही करण्याची मागणी लावून धरली आहे.
शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना नांदेड जिल्ह्यातील तामसा येथे घडल्याने संबंध जिल्हाभरात शिक्षकाच्या कृत्याचा विविध संघटनांकडून निषेध व्यक्त केला जात आहे. तामसा येथील माध्यमिक शाळेच्या दहावी वर्गातील विद्यार्थीनीवर बलात्कार केला आहे. शिक्षकाच्या अत्याचारानंतर ही अल्पवीयन मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा सर्व धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
इयत्ता दहावीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध पाजवून शिक्षकानेच वारंवार लैंगिक अत्याचार आणि गर्भपात केल्याची माहिती कुटुंबीयांना कळाली. मुलीच्या तक्रारीवरुन आरोपी शिक्षक राजूसिंह चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ तामसा शहर कडकडीत बंद करण्यात आले होते. गुन्हा दाखल झाल्याचे समाजाचं मुख्याध्यापक फरार झाला असून, पोलीस पथक आरोपीच्या शोधात रवाना झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
