मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ उस्माननगर येथे कॅन्डल माॅर्च रॅली.. उपोषणाचा चौथा दिवस

उस्माननगर। बहुचर्चित मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला असून आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी (जिल्हा जालना) येथे आंदोलन सुरू केले आहे .या आंदोलनाच्या समर्थनार्थ उस्माननगर तालुका कंधार येथे सकल मराठा क्रांती बांधव मोर्चाच्या वतीने लहानापासून ते मोठ्यापर्यंत महिला, पुरुष यांनी कॅण्डल मार्च काढून 30 ऑक्टोबर रोजी आंदोलन केले. तर येथील श्रीराम काळम पाटील यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस असून तब्येत खालवत असल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी करून कळविले आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या उपोषणानंतर राज्य सरकारने आरक्षण देण्यासाठी 40 दिवसाची मुदत मागितली होती .ही मुदत संपली असून संपूर्ण राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षण आंदोलन गावागावात उभे राहू लागले आहे. आरक्षणासाठी समाज बांधव आक्रमक झाला असून आंदोलन सुरू झाली आहेत. गावागावांमध्ये सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात येत असून . ,तसे बॅनर जागोजागी झळकू लागले आहेत.मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आंदोलन सुरू केले असून या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उस्माननगर तालुका कंधार येथील सामाजिक कार्यकर्ते श्रीराम काळमपाटील हे 28 ऑक्टोबर पासून उपोषणाला बसले आहेत.
त्यांचा आज पाचवा दिवस असून, त्यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तब्येत खालवत असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर लोणे व सपोनी शिवप्रकाश मुळे यांनी सांगितले आहे. 30 ऑक्टोबर रोजी रात्री सात वाजता मराठा समाज बांधवां तरुण पुरुष ,महिला यांनी जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ शासनाचा निषेध करीत कॅण्डल मार्च रॅली काढून सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या. यावेळी लहाना पासून ते मोठ्यापर्यंत सर्व तरूण, ज्येष्ठ नागरिक बांधव उपस्थित होते.
