फिरत्या वाहनावरील दुकानासाठी दिव्यांगांना अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड| महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाकडून राबविण्यात येणारी दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल) मोफत उपलब्ध करून देण्याची योजना आहे. या योजनेचा लाभ राज्यातील गरजू दिव्यांग व्यक्तींना मिळण्यासाठी अर्जदारांना नावनोंदणी (अर्ज) करण्यासाठी नुकतेच पोर्टल सुरू करण्यात आले आहे.
दिव्यांग व्यक्तींकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यासाठी ttps://evehicleform.mshfdc.co.in ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. या लिंकद्वारे दिव्यांग व्यक्तींना ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी दि. 4 जानेवारी 2024 रोजी स. 10 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या योजनेचा लाभ अधिकाधिक दिव्यांग व्यक्तींनी घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.
दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल) मोफत उपलब्ध करून देण्याबाबतची योजना लागू करण्यासंदर्भात 10 जून 2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीची कार्यवाही महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्या. यांच्या स्तरावरून सुरू आहे. या योजनेचा उद्देश दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे. दिव्यांग व्यक्तींचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे. सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या परिवार/कुटुंबासमवेत जीवन जगण्यास सक्षम करणे हा आहे.
जागतिक कौशल्य स्पर्धा 2024 साठी राज्य व जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागाचे आवाहन
सन 2024 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या जागतिक कौशल्य स्पर्धेकरीता इच्छुक असणाऱ्या पात्र उमेदवारांनी https://kaushalya.mahaswayam.gov.in या लिंकवर भेट देऊन 7 जानेवारी 2024 पर्यंत जास्तीत जास्त नाव नोंदणी करावे, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता सहायक आयुक्त यांनी केले आहे.
जागतिक कौशल्य स्पर्धा दर दोन वर्षांनी होते आणि ही जगातील सर्वात मोठी व्यवसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा असून जगभरातील 1 जानेवारी 2002 नंतर जन्म झालेल्या तरुणांकरीता त्यांच्यातील कौशल्य सादर करण्याची स्पर्धा आहे. ही स्पर्धा ऑलिम्पिक खेळासारखीच आहे. याबाबत अधिक माहितीसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता सहायक आयुक्त कार्यालयाशी संपर्क करावा.
