उद्या 14 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र बंद ची हाक – सकल मराठा समाज, नांदेड
नांदेड। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून 20 जानेवारी रोजी करोडो समाज बांधव हे मुंबईला धडकले होते, तेव्हा करोडो समाज बांधवांच्या उपस्थितीत या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना अधिसूचनेचे पत्रक देऊन आश्वासित केलं होतं.
मराठा समाजाच्या संपूर्ण मागण्या मान्य करीत “सगे सोयरे” हा शब्द कायद्यात घेत एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलावून मराठा आरक्षणाचा कायदा बनवून घटनेत टिकणारं आणि ओबीसी प्रवर्गातून मराठा आरक्षण देऊ. ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांच्या परिवाराला आणि ज्यांच्या नोंदी सापडत नाहीत त्यांच्या नातेवाईकांच्या नोंदी आधारे सगे सोयरे या कायद्या आधारे बहुतांश मराठा समाजाला आरक्षण देऊ, अंतरवाली सह महाराष्ट्र भरातील सरसकट गुन्हे मागे घेऊ यासह इतर मागण्यांचे लेखी आश्वासन देऊन सुद्धा अजुन त्याची कुठलीही कार्यवाही सुरु केली नाही.
किंवा 15 तारखेला एक दिवसीय अधिवेशन बोलावन्यासंदर्भात आज पर्यंत कुठलंही नोटिफिकेशन काढण्यात आलेलं नाही म्हणुन या सर्व खोट्या आश्वासनाला आपण बळी पडलो का काय ही भावना मराठा समाजाच्या तळागाळातील समाज बांधवांच्या मनात रुजल्या मुळे समाज सरकार विषयी अतिशय तीव्र संताप व्यक्त करीत आहे.
मागील 10 तारखेपासून या वरील सर्व मागण्या घेऊन अंतरवाली सराटी येथे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणास बसले असुन त्यांची तब्बेत ही दिवसेंदिवस नाजूक होत चाली असताना सरकारचे त्याकडे सुद्धा सपशेल दुर्लक्ष असल्या कारणाने सकल मराठा समाज, महाराष्ट्र राज्याने 14 फेब्रुवारी रोजी “महाराष्ट्र बंद” ची हाक दिली.
या हाकेला प्रतिसाद देत, सकल मराठा समाज, नांदेड सुद्धा यात सहभागी होणार आहे उद्याचा बंद हा अतिशय शांततेत होणार असुन कुठेही त्याला गालबोट लावन्याचा प्रयत्न करू नये कारण शांततेचं युद्ध हे सरकार ला परवडणारं नसेल असे नम्र आवाहन करीत,प्रशासनाच्या माध्यमातून सर्व व्यापारी वर्गाना विनंती करण्यात आली की, उद्या दि.14 रोजी आप आपली प्रतिष्ठाने बंद ठेऊन सकल मराठा समाजाला सहकार्य करावे.
तसेच या राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथराव शिंदे यांना सुद्धा त्यानी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देत आमच्या मागण्यांचे निवेदन ही जिल्हाधिकारी श्रीयुत अभिजित राऊत यांच्या मार्फत सकाळी ठिक 11.00 वाजता पाठवण्यात येणार आहे. अशी माहिती सकल मराठा समाज, नांदेड चे मराठा सेवक श्याम पाटील वडजे यांनी दिले.