हिमायतनगर,दत्ता शिराणे। भारतीय स्टेट बँकेची ऋण समाधान योजना २०२३- २०२४ एकवेळ तडजोड योजना ( OTS ) , अर्थिक अडचणीमुळे थकीत कर्ज दाराच्या मदतीसाठी भारतीय स्टेट बँक तर्फे एकवेळ तडजोड योजना (OTS) घोषित करण्यात आली आहे. या प्रभावी योजनेत सहभाग नोंदवून कर्जमुक्त होण्याबरोबरच अर्थिक बचतीचाही पात्र लाभधारकांनी फायदा घ्यावा. असे अवाहन सरसम येथील भारतीय स्टेट बँक शाखेचे शाखा अधिकारी प्रशांत देसले यांनी केले आहे.
तडजोडीची पुर्ण रक्कम एकसाथ ३१ डिसेंबर २०२३ पुर्वी भरल्यास ५ % अतिरिक्त सुट देण्यात येणार आहे. या योजनेची ठळक वैशिष्ट्य अशी की, योजना दि. २० ऑक्टोबर २०२३ पासून ३१ मार्च २०२४ पर्यत, योजनेद्वारे खालील प्रमाणे आकर्षक सवलतीचे प्रयोजनही करण्यात आले आहे.
सर्व पात्र खात्यामध्ये NPA तारखेपासून च्या प्रतिकात्मक व्याजामध्ये सुट, परत फेडीच्या रक्कमेत १५ % ते ७०% भरीव सुट, कायदेशीर व इतर खर्च माफ, मयत खातेदारांच्या कर्जासाठी विशेष सवलत, योजना बँकेच्या अटी व नियमा अधिन राहणार आहेत. या प्रभावी योजनेत जास्तीत जास्त थकबाकीदार कर्जदार व ग्राहकांनी मोठ्याप्रमाणात सहभाग नोंदवून लाभ घ्यावा. असे अवाहन शाखा अधिकारी प्रशांत देसले यांनी केले आहे.