नायगाव, रामप्रसाद चन्नावार| भाजपाओबीसी मोर्चाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून यात जिल्हा चिटणीस पदी शंकर नागा वडपत्रे .तर नरसी येथील पत्रकार गोविंद रामराव (टोकलवाड) नरसीकर. यांची जिल्हा उपाध्यक्ष पदी व माधव गुणाजी माचनवाड यांची निवड करण्यात आली आहे.
आगामी काळात होणाऱ्या लोकसभा, विधानसभा स्थानिक व स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेवून भाजपा जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) हानमंत पाटील नरोटे यांनी भाजपा ओबीसी मोर्चा ची जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर केली.जिल्हा चिटणीस शंकर वडपत्रे.(नायगांव)जिल्हा उपाध्यक्ष गोविंद नरसीकर.व जिल्हा उपाध्यक्ष माधव माचनवाड ( बरबडा) यांची निवड करण्यात आली आहे.या निवडीबद्दल माणिकराव लोहगावे. बालाजी बच्चेवार. व्यंकटराव पा. चव्हाण. शिवाजी पाटील वडजे. गजानन पाटील काडांळकर,परमेश्वर पाटील जाधव काडांळकर.सह अनेकांनी अभिनंदन केले आहे.