भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे यांनी केली पालावर दिवाळी साजरी
नांदेड| सर्व समाज घटकाचे आर्थिक दारिद्र्य नष्ट होऊन प्रत्येकाच्या घरी सुभता यावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक सामाजिक विकासाच्या योजना राबविण्यात येत असताना या वर्षीची दिवाळी पालावर जाऊन साजरी करावी अशा सूचना प्रदेशाध्यक्ष यांनी दिल्या होत्या .
या सूचनांचे पालन करत नांदेड भाजपा जिल्हाध्यक्ष डॉक्टर संतुकराव हंबर्डे यांनी आज जवाहर नगर जवळील पालावर जाऊन तेथील वंचित आणि गोरगरिबांसोबत आपली दिवाळी साजरी केली . हंबर्डे यांच्या वतीने येथील मुलांना मिठाईचे वाटप करण्यात आले तर याचवेळी त्यांना फटाक्यांचा आनंद घेता आला. त्यामुळे पलावरील मुलांच्या चेहऱ्यावर आज हसू फुलले होते.
आर्थिक दारिद्र्यामुळे पालावर राहून आपले जीवन व्यतीत करणाऱ्या समाजातील दुर्बल घटकांच्या घरातही दिवाळीचा आनंद फुलला पाहिजे. त्यांनाही मीष्ठान्नाचा स्वाद घेत फटाके आणि फुलझडांच्या दीपोत्सवामध्ये सहभागी होत आले पाहिजे. प्रत्येकाच्या घरातील दिवाळी अत्यंत उत्साहात साजरी झाली पाहिजे यासाठी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी थेट पालावर जाऊन दिवाळी साजरी करावी अशा सूचना केल्या होत्या.
या सूचनेनुसार आज नांदेड भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे यांनी तुपा जवळील जवाहर नगर येथील दुर्बल घटकाच्या पालावर जाऊन आपली दिवाळी साजरी केली . प्रदेशाधिशांच्या सूचनेनुसार यावेळी पारावरील मुलांना नवीन कपडे देण्यात आले. त्यांच्यासोबत फटाके फोडण्यात आले तर यावेळी मिष्ठान्नाचा स्वादही त्यांना देण्यात आला. त्यामुळे डॉ. संतुकराव हंबर्डे यांचे सामाजिक दायित्व आज पुन्हा एकदा दिसून आले. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. संतुक हंबर्डे यांच्यासह भाजपा प्रदेश सचिव देविदास राठोड, माजी महानगर भाजपा जिल्हाध्यक्ष प्रवीण साले , प्रदेश सदस्य महेश बाळू खोमणे, अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेश सदस्य शंकरराव मनाळकर , महानगर सचिव मनोज जाधव, भास्कर डोईबळे आदींची उपस्थिती होती.