भोकर। महाराष्ट्र राज्य हिवताप कर्मचारी सहकारी पतपेढी म.नांदेड यांची संचालक मंडळ निवडणूक २०२३-२८ करीता आज भोकर येथे विकास सहकारी पॅनलचा प्रचार दौरा निमित्त हत्तीरोग नियंत्रण उपपथक भोकर येथे भोकर तालुक्यातील हत्तीरोग नियंत्रण उपपथक भोकर, किनी व ग्रामीण रुग्णालय भोकर येथील १७ मतदार सभासद उपस्थित होते. सर्वानी शिलाई मशिन या निशाणीवर मतदान करणार आहोत अशी हमी दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी चेअरमन उमाकांत वाखरडकर, विकास सहकारी पॅनल प्रमुख व हिवताप पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन सुभाष कल्याणकर, माजी उपाध्यक्ष रघुनाथ हुंबे, माजी संचालक राजकुमार ढवळे, महाराष्ट्र राज्य हिवताप कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे विद्यमान सचिव सत्यजीत टिप्रेसवार आरोग्य पर्यवेक्षक भोकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन हत्तीरोग नियंत्रण उपपथक भोकरचे आरोग्य सहाय्यक व्यंकटेश पुलकंठवार यांनी केले. सर्वाचे यथोचित सत्कार केला.
व्याज दर एक टक्काने कमी केले, दिर्घ मुदती कर्ज मर्यादा पाच लाखचे सात लाख, सात लाखचे दहा लाख केले, आकस्मिक कर्ज मर्यादा पन्नास हजार केले, मयत झाले तर त्यांच्या परिवारास सानुग्रह अनुदान पाच हजार वरुन दहा हजार केले व आता दिर्घ मुदती,आकस्मिक कर्ज मर्यादा वाढ, सानुग्रह अनुदान वाढ करण्यात येणार आहे. लवकरच विमा सर्व सभासद यांचा काढण्यात येणार आहे. संस्थेची प्रशस्त ईमारत, नविन वास्तु घेण्यात येणार आहे अशी माहिती सत्यजीत टिप्रेसवार यांनी दिली. माणिक गिते, चंद्रभान धोंडगे, राजकुमार ढवळे,अशोक ढवळे यांनी भाषणे केली व विकास सहकारी पॅनेलच्या सर्व तेरा उमेदवार यांना शिलाई मशीन या निशाणी वर मतदान करून निवडून आणण्याचे विनंती केली.
विकास सहकारी पॅनलचे उमेदवार सर्व श्री माणिक गिते, पप्पू नाईक देसाई, मोहन पेंढारे, चंद्रभान धोंडगे, बालाजी आळणे, मनोहर खानसोळे, अशोक ढवळे, विठ्ठल मोरे, संतोष माकु, व्यंकट माचनवाड, गिरीश पाटील उमेदवार उपस्थित होते.
विकास सहकारी पॅनलचे उमेदवार यांच्या ” शिलाई मशिन ” या निशाणीवर दि.२२ ऑक्टोबर २०२३ रोज रविवारी सकाळी ८ ते दुपारी ४ पर्यंत महाराष्ट्र राज्य हिवताप कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादीत नांदेड येथील कार्यालयात मगनपुरा येथे मतदान करुन प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचे आश्वासन सर्व सभासद यांनी दिले. आवाहन केले.
यावेळी आरोग्य सहाय्यक व्यंकटेश पुलकंठवार, दत्तात्रेय ढाले, आरोग्य सहाय्यक, पांडुरंग तमलवाड, प्रदीप गोधणे, संजय धुमाळे, अरुण खांडरे, गजानन कंकाळ, व्यंकटी बकाल, नामदेव कंधारे आरोग्य कर्मचारी,रामराव जाधव, राजू चव्हाण, रवींद्र चव्हाण, इंदल चव्हाण, ज्ञानेश्वर खोकले, मारोती गेंदेवाड क्षेत्र कर्मचारी उपस्थित होते.