मुखेड/नांदेड| भोई समाज समन्वय समितीच्या वतीने दि.१३ फेब्रुवारी २४ रोजी दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्ह्यातील सर्व भोई समाजाचा मोर्चा धडकणार असल्याचे भोई समाज समन्वय समितीने निवेदनात म्हटल आहे.
भोई समाजाला अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गात समावेश करणे तसेच आर्थिक विकास महामंडळाची स्वतंत्रपणे स्थापना करून द्या, नांदेड येथील चिकलवाडी भोईगल्लीचे पुनर्वसन करण्यात यावे अशा अनेक मागण्या मांडण्यात आले आहेत. स्वातंत्र्या पासून तर आज पर्यंत भोई समाजाला न्याय मिळालेला नाही, दारिद्र्याखाली जीवन जगणारा भोई समाज अनेक वर्षापासून शासनाकडे न्याय मागत आहे, मात्र शासनाने या समाजाला आतापर्यंत न्याय दिलेला नाही.
भोई समाज हा दैनंदिन जीवन जगण्यासाठी व उदरनिर्वाह भागवण्यासाठी मासेमारी हा प्रमुख व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह चालवतो परंतु शासनाच्या ज्या कांही योजना आहेत त्या योजनेचा भोई समाजाला फायदा होत नाही. त्यासाठी शासनाने भोई समाजाची अडचण लक्षात घेऊन प्रश्न मार्गी लावावेत असे मत नांदेड जिल्ह्यातील भोई समाजाने दैनिक न्याय टाईम्स समोर व्यक्त केला आहे. मागण्या पूर्ण नाही झाल्यास, महाराष्ट्रातील सर्व भोई समाज शासनाच्या विरोध्दात बंड पुकारण्याची यावेळी ग्वाही समन्वय समितीने दिली आहे.