नांदेड। येथील विंग्स टू एक्सप्लोअर अॅन्ड करिअर कॉन्सिलिंगचे संचालक भगवान चिंतेवार यांना महाराष्ट्र उद्योजकता पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात आले.
छत्रपती संभाजीनगर येथे प्रसिध्द चित्रपट अभिनेत्री वर्षा ऊसगावकर यांच्या हस्ते हॉटेल ताज विवांता येथे नुकताच हा पुरस्कार त्यांना नुकताच देण्यात आला. यावेळी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. तर अभिनेत्री स्पृहा जोशी यांचीही यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
महाराष्ट्रातील नामांकित व उदयोन्मुख उद्योजकांच्या सन्मानार्थ हा पुरस्कार देण्यात येतो. संशोधन, ब्रँडिंग, फिल्मस् अँड मिडिया प्रेझेंटर या क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या मुंबई येथील रिसील या संस्थेच्या वतीने हा महाराष्ट्र बिझनेस आयकॉन अवार्डस 2024 अंतर्गत भगवान चिंतेवार यांना नांदेड येथील मोस्ट प्रॉमिसिंग एज्युकेशन आणि करिअर कन्सलटंट विंग्स टू एक्सप्लोअरच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना केलेल्या मार्गदर्शन व सहाय्याच्या कार्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला.
मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचा मित्र परिवार आणि नातेवाई यांनी त्यांना भरभरून शुभेच्छा देवून अभिनंदन केले आहे.