नांदेडलाईफस्टाईल

पांढरेशुभ्र दाट‎ धुक्यामुळे लोहा तालुक्यातील मौजे जोमेगाव‌ जवळील तलावात ‌उतरली

नांदेड| शहरासह जिल्ह्यात मागील‎दोन ते तीन दिवसांपासून पहाटे पांढरेशुभ्र दाट‎ धुके पडत आहे. यामुळे शुक्रवारी सकाळी‎‌ आठ वाजेच्या सुमारास नांदेड‎ डेपोची लाडका‌ जाणारी भरधाव‎ वेगातील ‌बस‌ क्रमांक एमएच ७ सी ७२४३ एस टी महामंडळाची हि बसगाडी लोहा तालुक्यातील मौजे जोमेगाव‌ जवळील एका‌ ‎‌तलावात ‌उतरली. ‌दरम्यान चालक‎ एम. ई. सोनकांबळे व वाहक बी. एम.‎कापसीकर यांनी दाखवलेल्या ‎प्रसंगावधानाने बसवर नियंत्रण‎ मिळवता आले. १२ फूट‌ खोल‎ खड्ड्यात जाणारी बस थांबवण्यात ‎आली.

नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून‎अवकाळी पाऊस होत आहे. याचा‎ सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला‎ बसला आहे. ढगाळ वातावरण आणि‎ दाट धुक्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश‎ भागात दृश्यमानता कमी झाली आहे.‎ परिणामी शुक्रवारी सकाळी‎‌ आठ वाजेच्या सुमारास नांदेड‎ डेपोची लाडका‌ जाणारी भरधाव‎ वेगातील ‌एस टी महामंडळाची बस‌ क्रमांक एमएच ७ सी ७२४३ लोहा तालुक्यातील मौजे जोमेगाव‌ जवळील एका‌ ‎‌तलावात ‌उतरली. या बसमधील १२ प्रवासी‎ बालंबाल बचावले असून, या‎तलावात ‌गाळ‌ उपसा झाला‌ होता‌.‌‎ त्यामुळे तलाव‌ १४ फुटांपर्यंत खोल‌‎ झाला आहे.‎ या धुक्याच्या वातावरणामुळे पिकांवरही‎ विपरीत परिणाम होत आहे. तुरीची ‎फुलगळ होत आहे तर हरभऱ्यावर मर रोगांचा प्रादुर्भाव वाढलं आहे, पुढील आठवडा‎ असेच वातावरण राहणार असल्याचे‎ तज्ज्ञांनी सांगितले.‎

किमान तापमान २ ते ३‎ अंश सेल्सियसने घटणार‎
दरम्यान, प्रादेशिक हवामान केंद्राने‎ वर्तवलेल्या अंदाजानुसार ‎मराठवाड्यात पुढील पाच दिवस ‎हवामान कोरडे राहील. ९ व १० ‎डिसेंबरला आकाश अंशत: ढगाळ‎राहण्याची शक्यता आहे. पुढील‎काही दिवस किमान तापमानात‎ हळूहळू २ ते ३ अंश सेल्सियसने घट‎ होण्याची शक्यता आहे, असे ‎परभणी येथील वसंतराव नाईक ‎मराठवाडा कृषी विद्यापीठातील ‎ग्रामीण कृषी मोसम विभागाने ‎कळवले आहे.‎

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!