नांदेडलाईफस्टाईल
सकल मराठा समाजास आरक्षण मिळेपर्यंत भायेगाव गावामध्ये सर्व राजकीय पक्षाच्या पुढा-यांना प्रवेशबंदी

नवीन नांदेड। नांदेड तालुक्यातील भायेगाव येथे सकल मराठा समाजास आरक्षण मिळेपर्यंत गावामध्ये सर्व राजकीय पक्षाचा पुढा -यांना गावबंदी करण्यात आली असून जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे कळविले आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षण मिळेपर्यंत पाठींबा सर्व राजकीय पक्षाच्या पुढा-यांना भायेगाव गावामध्ये प्रवेशबंदी करण्याचा निर्णय सर्व गावाच्या वतीने ग्रामसभा घेवून सकल मराठा समाजाच्या वतीने एकमताने ठराव घेण्यात आला आहे. गावातील मारोती मंदिर परिसरात सकल समाज बांधवांनी एकत्र येऊन गाव बंदी ठराव घेऊन आरक्षण मिळाले पाहिजे यासह आरक्षण संदर्भात घोषणा बाजी केले, यावेळी सर्वपक्षीय पदाधिकारी, जेष्ठ नागरिक, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
