नायगाव/नांदेड। वेअर हाउसचा परवाना नुतणीकरण करण्याबाबत विनंती केली असता 10 हजाराची लाच मागणाऱ्या लबाबुराव चतरू पवार, वय 54 वर्षे, पद – सहकार अधिकारी (श्रेणी-1), सहाय्यक निबंधक कार्यालय, सहकारी संस्था,सहकार, पणन व वस्त्रोदयोग विभाग, नायगाव (खै.), ता. नायगाव (खै.), जि. नांदेड. रा. पितृछाया निवास, जनार्दननगर, हनुमान गढ, नांदेड यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडुन ताब्यात घेतले आहे. या कार्यवाही मुळ नायगाव सह नांदेड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, यातील तक्रारदार हे रिध्दी ऍग्रो वेअर हाउसवर मागील 3 वर्षापासून वॉचमन आहेत. त्यांचे मालकाने त्यांना वेअर हाउसचा परवाना नुतणीकरण करण्याबाबत सांगितले असता, तक्रारदार यांनी सहाय्यक निबधंक सोसायटी कार्यालय, नायगाव येथे जावून रितसर शासकीय फि भरून बॅंकेचे चालान भरून त्याची प्रत सहाय्यक निबंधक सोसायटी कार्यालय, नायगाव येथील सहकार अधिकारी बाबुराव पवार यांना आणून दिली. तेव्हा आरोपी लोकसेवक बाबुराव पवार यांनी मालकाकडून 10,000/- रुपये घेवून या नंतरच काम होईल असे म्हणून दहा हजार रूपयाची मागणी केली. सदरचे 10,000/- रुपये ही लाच असल्याचे तक्रारदार व त्यांचे मालक यांना खात्री झाल्याने त्यांना ती देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड येथे तक्रार दिली होती.
त्यानंतर दि. 20/11/2023 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथकाने तक्रारदार यांना लाच मागणी पडताळणीसाठी पाठविले असता, आरोपी लोकसेवक पवार यांनी तुमच्या मालकाला घेवून या असे सांगितल्याने. आज दि. 24/11/2023 रोजी तक्रारदार व त्यांचे मालक यांना आरोपी लोकसेवक पवार यांची भेट घेण्यासाठी पाठविले असता, आरोपी लोकसेवक पवार यांनी पंचासमक्ष वेअर हाउसचे परवान्याचे नुतणीकरणासाठी दहा हजार रूपयाची मागणी करून पंचासमक्ष 10,000/- रुपये लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. लोकसेवक बाबुराव चत्रु पवार यांना ताब्यात घेण्यात आले असुन पो.स्टे. नायगाव, ता. नायगाव, जि. नांदेड येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असुन पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड हे करीत आहेत.
ही कार्यवाही डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो,नांदेड परिक्षेत्र,नांदेड, मोबाईल क्र. 9623999944, पर्यवेक्षण अधिकारी राजेंद्र पाटील, पोलीस उप अधीक्षक
अँटी करप्शन ब्युरो,नांदेड परिक्षेत्र,नांदेड, मोबाईल क्र. 7350197197 यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा कारवाई पथक श्री प्रशांत पवार, पोलीस उप अधीक्षक, श्रीमती स्वप्नाली धुतराज, सपोउपनि श्री गजेंद्र मांजरमकर, पोह/शेख रसुल, पोना/राजेश राठोड, चापोना/प्रकाश मामुलवार ,अँटी करप्शन ब्युरो,नांदेड नांदेड, तपास अधिकारी श्रीमती प्रिती जाधव, पोलीस निरीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, नांदेड.
नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना अवाहन करण्यात येते की त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी* *यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम, एजेंट यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी* *व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ खालील दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा दुरध्वनी क्रमांक* 02462253512 टोल फ्रि क्रं.1064