बिलोली, गोविंद मुंडकर। जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्याचे अनुदान व पिक विमा रक्कम अध्याप नमिळाल्यामुळे बिलोली तालुक्यातील प्रभाकर पेंटे यांनी दिनांक 26 सप्टेंबर 2023 रोजी बिलोली तहसील कार्यालयासमोर स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. सुदैवाने पोलीस व नागरिकांच्या दक्षतेमुळे अनर्थ टळला.
खरीप हंगामात सोयाबीन तूर कापूस आधी पिकांच्या पेरणीनंतर जुलै महिन्यात संबंध बिलोली तालुक्यात मोठी अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीत तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले.जुलै महिना झालेल्या नुकसानी बाबत शासनाच्या वतीने पंचनामे करून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई देण्याचे घोषित केले होते. नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे होऊन तीन महिन्याचा काळ लोटला तरी अद्याप शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा खडकू ही न भेटल्यामुळे आदमपूर येथील माजी सरपंच प्रभाकर गंगाधरराव पेंटे यांनी तहसील कार्यालयाकडे रीतसर निवेदन देऊन 25 ऑक्टोबर 2023 पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई व पीक विमा लची रक्कम जमा करण्याची विनंती केली होती.
25 ऑक्टोबर पर्यंत नुकसान भरपाई व पिक विम्याची रक्कम न पडल्यास आत्मदहनाचा इशारा देण्यात आला होता. निवेदनाद्वारे देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार दिनांक 26 सप्टेंबर रोजी प्रभाकर पेंटे यांनी सकाळी 11 ते साडेअकरा वाजेच्या सुमारास पेट्रोलने भरलेला डबा अंगावर ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला सुदैवाने त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या रामतीर्थ पोलीस स्टेशन येथील कर्मचारी व नागरिकांनी डबा दूर फेकून देत पेंटे यांना ताब्यात घेतले त्यामुळे पुढील अनर्थ टळला.