
नायगांव, रामप्रसाद चन्नावार| मग्रारोहायो च्या फळबाग लागवड योजनेंतर्गत इ-म्स्टर ऑनलाईन करण्यासाठी १२०० रूपायची लाच घेताना संघणक सहाय्यकास (कंत्राटी) रंगेहाथ पकडले ही कारवाई नायगांव तहसील कार्यालयात 19 ऑक्टोबर 2023 रोजी करण्यात आली आहे.
नायगांव तहसील कार्यालयातील महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचे संघणक सहाय्यक शिवराज दत्तराम नकाते यांनी अंतरगाव येथील शेतक-यास मग्रारोहायो योजनेंतर्गत स्वाताच्या शेतावर इस २०२१-२०२२ या वर्षांत फळबाग लागवडीसाठी १ लाख पन्नास हजारची योजना मंजुर झाली होती.
यातील चौथ्या टप्यातील इ-मस्टर ची रक्कम मिळाली नसल्याने तक्रारदार यांनी नायगांव तहसील कार्यालयातील संगणक सहाय्यक (कंत्राटी) यांना विचारले आसता . ऑनलाईन झाले नसल्याने अनुदान मिळाले नसल्याचे सांगण्यात आले. इ-मस्टर ऑनलाईन करण्यासाठी पंधराशे रूपायची मागणी संगणक सहाय्यक यांनी केली तडजोडी अंती पंचासमक्ष १२०० रूपये लाचेची मागणी करण्यात आली .
तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी नांदेड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथे जाऊन १८ ऑक्टोबर रोजी तक्रार देण्यात आली. १९ ऑक्टोबर रोजी लाच मागणीची पडताळणी करण्यात आली १२०० रूपायची मागणी शिवराज नकाते यांनी मान्य करून ते तक्रादार कडुन स्वतःहा स्विकारल्याने त्यांना लाचलुचपत विभागाने पकडून त्याच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या बेटकबिलोली येथील घरी कसुन चौकशी करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
ही कारवाई यशस्वी करण्यासाठी पोलीस अधिक्षक राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदिप थडवे, सपोउप नि. गजेंद्र मांजरमकर, पोलीस.शिपाई यशवंत दाबनवाड, इश्वर जाधव, मोरोती सोनटक्के, आदीचा सहभाग होता.
