करियरनांदेड

दहावी, बारावी परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर

नांदेड| महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, लातूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणारी इयत्ता दहावी व बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये आयोजित केली आहे. शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याचे हेतुने लेखी परीक्षेचे अंतिम वेळापत्रक पुढीलप्रमाणे तयार करण्यात आले आहे.

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 12 वी (सर्वसाधारण व द्विलक्षी विषय) व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम लेखी परीक्षा बुधवार 21 फेब्रुवारी 2024 ते मंगळवार 19 मार्च 2024 या कालावधीत होईल. माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान विषयांची ऑनलाईन परीक्षा इ. 12 वी बुधवार 20 मार्च 2024 ते शनिवार 23 मार्च 2024 कालावधीत होईल. तर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 10 वी लेखी परीक्षा शुक्रवार 1 मार्च 2024 ते मंगळवार 26 मार्च 2024 या कालावधीत होईल. दिनांक निहाय सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर 2 नोव्हेंबर 2023 पासून उपलब्ध करुन देण्यात आले आहे. संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे.

परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे छापील स्वरुपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम राहील. त्या छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करुन घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ठ व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉटस्ॲप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरु नये.

इ. 10 वी प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मुल्यमापन परीक्षा 10 फेब्रुवारी ते गुरुवार 29 फेब्रुवारी 2024 व इ. 12 वी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मुल्यमापन परीक्षा शुक्रवार 2 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी 2024 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे , असे राज्य मंडळाचे सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!