श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| सिंदखेड पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या वाई बाजार येथे अवैध मटका चालक व गांजा तस्कर समदभाईच्या मुसक्या आवळण्यासाठी सिंदखेड पोलिसांना अपयश का ? या मतळ्याखाली न्यूज प्लॅशवर बातमी झळकताच सिंदखेड पोलीस ठाण्याचे कर्तव्य दक्ष नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश जाधवर यांनी भर पावसात छञपती शिवाजी महाराज चौकातील मटका अड्यावर धाड टाकून एकास अटक केली आहे.माञ मटका किंग व गांजा तस्कर समदभाई हे चकमा देत पसार झाल्याची माहिती समोर आली आहे.
माहूर तालुक्यात मटका किंग व विविध गुन्ह्यातील प्रमुख म्हणून परिचीत असलेला सराईत गुन्हेगार समदभाई हा खुल्लम खुल्ला स्वतंत्रपणे मटका जुगार येथील छञपती शिवाजी महाराज चौकात चालवित असे त्यामुळे या भागात मटका लावणार्याची व गांजा ओढणार्याची मोठी गर्दी होत होती त्यामुळे येथील ग्रामस्थामध्ये मोठी नाराजी पसरली होती.याचीच दखल घेत न्यूज प्लॅशच्या प्रतिनिधीने अट्टल गुन्हेगार समदभाई आपल्या मटका अड्यावर मटक्याचे अकडे चिठ्ठीवर गिरवित असल्याचा फोटोसह न्यूज प्लॅशने दि.१५ जुलै रोजी बातमी प्रसारीत केली होती.
याच बातमीची दखल घेत सिंदखेड पोलीस ठाण्याचे नूतन सहायक पोलीस निरीक्षक रमेश जाधवर यांनी स्वता दि.१६ जुलै रोजी सकाळी सुमारे १० वाजताच्या सुमारास भर पावसात वाई बाजार येथील छञपती शिवाजी महाराज चौकातील मटका अड्यावर धाड टाकली परंतु या धाडीत रोजनदारीवर आकडे मोड करणार्या एका इमास अटक केल्याची माहिती समोर आली आहे.परंतु सराईत मटका चालक समदभाई हे नेहमी प्रमाणे पोलीसांना चमका देत पसार झाल्याने सिंदखेड पोलीसांना पुन्हा अपयश आल्याची चर्चा होत आहे.
याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. आता पुन्हा मटका कधी सुरू होणार ? की कायमचा बंद होणार याकडे वाई बाजार परिसरातील मटकाबहाद्दरांचे लक्ष लागले आहे.पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांत समाधान व्यक्त केले जात आहे.परंतु सराईत गुन्हेगार समदभाईचे काय ? असा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे.बातमी लिहे पर्यंत सिंदखेड पोलीस ठाण्यात या धडक कारवाई प्रकरणी पुढील तपास व गुन्हे नोंद करण्याची प्रक्रिया चालु असल्याची माहीती मिळाली आहे.