क्राईमनांदेड

हिमायतनगर शहरातील लकडोबा चौक हनुमान मंदिरातून एप्लीफायर चोरीला ; चोरटा सिसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद

हिमायतनगर| शहरातील लकडोबा चौक येथील हनुमान मंदिरातून ७० हजार रूपये किंमतीचा एप्लीफायर अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे. हि घटना दिनांक ८ रविवारी रात्री साडेसात वाजताच्या दरम्यान घडली आहे.

हिमायतनगर शहरासह ग्रामीण परिसरात गेल्या आठवडा भरापासून संततधार पाऊस कोसळत आहे. पाऊस व अंधाराचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी मंदिरात भगवी शाल पांघरून प्रवेश केला. हनुमान देवाचे दर्शन घेण्याचे नाटक करून ७० हजार रूपये किंमतीचा आहुजा कंपनीचा एप्लीफायर चोरून नेला आहे. हि घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसून येत आहे.

दरम्यान सकाळी दर्शनाला आलेल्या भाविकांच्या ही चोरीची बाब लक्षात आली. हिमायतनगर पोलीसांत दिलेल्या माहितीनुसार सकाळी पोलीस घटनास्थळी होवून पंचनामा केला. सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पाहणी पोलीसांनी केली असून, त्या दिशेने पोलीस तपास करीत आहेत. हिमायतनगर शहरात लागत होत असलेल्या चोरीच्या घटना लक्षात घेता पोलिसांना चोरांचा बंदोबस्त करण्याचे मोठे आव्हान समोर उभे असल्याचे दिसते आहे.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!