
नांदेड| वीरशैव लिंगायत समाजातील सामाजिक, कलात्मक, समाज संघटनात्मक, अध्यात्मिक प्रबोधन व साहित्यिक क्षेत्रात काम करीत असणाऱ्या व्यक्ती व संस्थांनी महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्कारासाठी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे नांदेड येथील सहाय्यक संचालक शिवानंद मिनगिरे यांनी आज यासंदर्भात जारी केलेल्या पत्रकामध्ये महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्कारासाठी नियमावली बाबतचा शासन निर्णय 8 मार्च 2019 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. या शासन निर्णयान्वये समाजातील वेगळ्या काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना हा पुरस्कार दिला जातो. त्यासाठी अर्ज करणे मात्र अनिवार्य असल्याचे स्पष्ट केले आहे.
त्यामुळे या समाजातील जागरूक नागरिकांनी या समाजात वावरणाऱ्या अशा व्यक्तिमत्त्वाची व संस्थांची सन 2024-25 अशा रितसर अर्ज पुरस्कारासाठी सहायक संचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग नांदेड यांच्याकडे बुधवार 9 एप्रिल 2025 पर्यंत विहित केलेल्या नमुन्यामध्ये कार्यालयीन वेळेत सादर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
दि. 8 मार्च 2019 शासन निर्णयामध्ये सर्व माहिती उपलब्ध आहे. शासनाच्या वेबसाईटवर हा शासन निर्णय उपलब्ध आहे. ही माहिती शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. त्यामुळे समाजातील व्यक्ती व संस्थांनी मुदतीत 9 एप्रिल पर्यंत शासन पत्र 22 जुलै 2019 अन्वये विहित केलेल्या नमुन्यात रितसर अर्ज करावा. अर्जासोबत नियमाप्रमाणे आवश्यक व योग्य ती माहिती जोडावी, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
