श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे। महाराष्ट्रात होऊ घातलेल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने माहूर शहर,जिल्हा, तालुका कार्यकारणीच्या बैठकीचे आयोजन दिनांक 9 रोजी करण्यात आले आहे.
या बैठकीला कार्यकारिणीतील असलेले प्रमुख पदाधिकारी, माहूर मंडळातील सर्व बूथ अध्यक्ष,बूथ सचिव,बूथ बिएलओ २,शक्ति केंद्र प्रमुख तसेच माहूर शहरातील सर्व बूथ अध्यक्ष, बूथ सचिव, बूथ बि, एल, ओ, २ /शक्ती केंद्र प्रमुख मंडल कार्यकारिणी, जिल्हा पदाधिकारी,प्रदेश कार्यकारिणी सदस्य, महिला मोर्चा तालुका, महिला मोर्चा जिल्हा, सर्व आघाडी अध्यक्ष , सर्व आघाडीचे सरचिटणीस सर्व प्रकोस्ट तालुका अध्यक्ष याच्यांसह पदाधिकार्याची तातडीची बैठक येथील शासकीय विश्रामगृहात दि.९ आॅक्टोबर रोजी १२ वा. आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीला बैठकीचे अध्यक्ष म्हणून या भागाचे आ.भीमरावजी केराम,प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्र.सं.स. प्रकोष्ठ शशिकांत द्विवेदी छत्तीसगढ़ तर विस्तारक किनवट-माहूर सुरेश लंगडापुरे राहणार असल्याची माहिती भाजपाचे ता.अध्यक्ष कांतराव घोडेकर, शहराध्यक्ष पुरुषोत्तम लांडगे यांनी दिली आहे.