सवना ज येथे भूमिअभिलेख कार्यालयाकडून प्राॅपर्टीकार्ड (सनद) चे वाटप
हिमायतनगर| तालुक्यातील 50 गावचे साटेलाईट ड्रोन नकाशा आधारे प्राॅपर्टी कार्ड( सनद) गाव स्तरावर येवून भूभिअभिलेख कार्यालयाच्या कर्मचार्यांनी प्रत्येक्ष मोजमाप घेवून घराची सनद तयार केली. बोरगडी नंतर सवना ज. येथे 13 डिसेंबरला ग्रामपंचायत कार्यालयात प्राॅपर्टी कार्डचे घराच्या आकारानुसार फीस घेवून पावती देवून वाटप कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी पोलीस पाटील गणपत गोपेवाड होते. प्रमुख अतिथी उपाधीक्षक भूमिअभिलेख अधिकारी आर. आर. मोरे , परिरक्षण भूमापन अधिकारी एस. आर. बारापञे, मुख्यालय सहाय्यक व्हि.सी.आडे , अरुण कपाळे, सोनबा राऊत, संतोष अनगुलवार, गणेशराव भूसाळे, संतराम आलेवाड, बालाजी बोलगंडे, अशोक राऊत, लक्ष्मण पैलेवाड आदी होते. मान्यवर पाहुण्याचे स्वागत गावकर्यांनी पुष्पहाराने केले प्रापर्टी कार्ड सनद वाटपाचा कार्यक्रम बराच वेळ चालला. 30 टक्के सनद घेणार्याच्या नावात भरपूर चूका आढळूनआल्या.
मोजमाप घेवून सुद्धा अनेकाची नावे वगळण्यात आली. यामुळे गावकर्यांनी खंत व्यक्त केली. नावात एवढ्या चूका कशा? बाहेरुन तर यादी केली नाही ना? अशी गावकर्यांनी शंका व्यक्त केली. या प्रसंगी भूमिअभिलेखचे उपाधीक्षक आर. आर. मोरे यांनी उपस्थित गावकर्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले ,नावातील चूका दुरुस्त करण्यासाठी घेतलेली सनद, आधार कार्ड, नमूना नं. 8 जोडून भूमिअभिलेखला अर्ज करा. तात्काळ सनद दुरुस्ती करुन मिळेल.
सॅटेलाईट नकाशा आधारे गावात येवून सर्वे करुन मोजमाप करुन सनद तयार करुन मिळतील असे सांगीतले. संचलन व अभार अशोक अनगुलवार यांनी केले. या प्रसंगी लक्ष्मण पैलेवाड,शंकर गोपतवाड, दयानंद आलेवाड, श्रीनिवास अनगुलवार, संजय राऊत,माधव जाधव, संतोष अनगुलवा बालाजी बोलगंडे, संदिप गोपेवाड, आदीसह गावकरी हजर होते.