लोहा। लातूर लोकसभा मतदार संघात ७ मे रोजी मतदान होत आहे. लोहा विधानसभा क्षेत्रातील ३३० मतदान केंद्रावर ३०एप्रिल पर्यंत सर्व मतदाराना वोटर स्लिप वाटप झाल्या पाहिजे असा सूचना सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अरुणा संगेवार यांनी दिल्या.
सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, श्रीमती अरुणा संगेवार, यांच्या उपस्थितीत केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) ,पर्यवेक्षक याची बैठक पार पडली यावेळी तहसीलदार विठ्ठल परळीकर कंधार तहसिलदार रामेश्वर गोरे, याची उपस्थिती होती.
म
तदान केंद्रस्तरीय अधिकारी व सर्व पर्यवेक्षक यांच्या बैठकीत सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अरुणा संगेवार यांनी सर्व केंद्रस्तरीय अधिकारी व पर्यवेक्षक यांनी ३० एप्रिल पर्यंत व्होटर स्लीपचे वाटप झाल्या पाहिजे. ज्या ठिकाणी तीन, चार व सहा मतदान केंद्र एकत्रित आहे अशा 165 मतदान केंद्रावर वेब कास्टींग कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.
मतदानाच्या दिवशी केंद्रस्तरीय अधिकारी यांनी मतदान केंद्रावर उपस्थित राहावे. १९ एप्रिल रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द झाली आहे. ती यादी केंद्रस्तरीय अधिकारी यांनी हस्तगत करावी मतदानाच्या दिवशी ती वापरावी सर्व केंद्रस्तरीय अधिकारी यांना ओळखपत्र देण्यात आलेले आहे त्याचा वापर मतदार माहिती सूची वाटप करतांना मतदानाच्या दिवशी करावा मतदार माहिती सूची वाटप करतांना करा. मतदार माहिती सूची वाटप करताना त्याची आपणास पुरविलेल्या रजिस्टरवर स्वाक्षरी घ्यावी. मतदान कसे करावे याची मार्गदर्शिका देण्यात आलेली असून ती व्यक्ती कुटुंबाला वाटप करण्यात यावी.असा महत्वाच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या तहसीलदार परळीकर ,तहसीलदार गोरे यांनी मार्गदर्शन केले.